Health Tips: शरीरासाठी काजू अधिक फायदेशीर की बदाम? जाणून घ्या...
Health Tips: सुका मेवा हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो, यात काजू आणि बदामाचा समावेश प्राधान्याने होतो.
Health Tips: काजू (Cashew) आणि बदाम (Almond) हे शरीरासाठी चांगले आहे. तंदुरुस्त आरोग्यासाठी काजू आणि बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराच्या अनेक गरजा आणि अतिरिक्त घटक पूर्ण करण्यासाठी या ड्रायफ्रुट्सचा वापर होतो आणि त्यामुळेच ते खूप महाग असतात. तरीही त्यापासून शरीराला बरेच फायदे मिळतात म्हणून लोक ते विकत घेतात आणि खातात. पण या दोन्ही ड्रायफ्रुटमधून सर्वात फायदेशीर काय? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का?
दोघांमधील फरकाबद्दल बोलायचं झालं तर काजू आणि बदाम दोन्हीचे स्वतंत्र फायदे आहेत. बदाम आणि काजू दोन्हीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, तरी बदामामधील फॅट शरीरासाठी अधिक चांगले मानले जातात.
काजूचे फायदे काय आहेत?
काजूबद्दल बोलायचं झालं तर काजूमध्ये भरपूर व्हिटॅमिन के आणि झिंक आहे. काजूत असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-ई आणि B-6 यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL कॉलेस्टरॉल) चं प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते. म्हणूनच काजू आणि बदाम या दोन्हींचे स्वतःचे वेगळे आरोग्य फायदे आहेत, असं म्हटलं जातं.
काजू मेंदूसाठी चांगले आहेत आणि मेंदूची शक्ती वाढवण्याचं काम काजू करतात. याशिवाय काजूमध्ये विशेषतः लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. लोह तुमच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे अशक्तपणा येत नाही आणि जस्त निरोगी आरोग्य आणि निरोगी दृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
काजू देखील मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतो. कॅलरीजबद्दल बोलायचं झालं तर 23 काजूमध्ये सुमारे 200 कॅलरीज असतात.
बदामाचे फायदे काय आहेत?
बदाम हा पोटासाठी चांगला मानला जातो, कारण बदामामध्ये सर्वाधिक फायबर असतात. काजूशी तुलना केल्यास बदामामध्ये जास्त फायबर आढळतात. याशिवाय बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई देखील असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मानले जाते. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की, बदाम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढवतात.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बदाम जास्त फायदेशीर ठरू शकतात. बदामामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण काजूपेक्षा जास्त असते आणि मॅग्नेशियमच्या माध्यमातून टाईप 2 मधुमेहाशी लढा दिला जाऊ शकतो किंवा मधुमेही रुग्णांसाठी ते फायदेशीर असल्याचं अनेक संशोधनांमध्ये स्पष्ट झालं आहं. कॅलरीजबद्दल बोलायचं झालं, तर 23 बदाममध्ये सुमारे 170 कॅलरीज आढळून येतात.
हेही वाचा:
Kitchen Tips: मिक्सरमध्ये 2 मिनिटांत पीठ मळण्याची सोपी ट्रिक; पाहा 'हा' अनोखा पर्याय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )