समृद्धी महामार्गावरील खड्डे बुजवायला कापडी पिशव्या-गोण्यांचा वापर, माजी मंत्री यांच्या पाहणीवेळी धक्कादायक प्रकार उघड
"समृद्धी"वरील निकृष्ट कामाची पोलिसात नोंदविली तक्रार
बुलढाणा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच मुंबईतील अटल सेतू वर पोहोचून तेथील पोच रस्त्याला पडलेले तडे दाखवून खळबळ उडवून दिली. सदर प्रकरण गाजत असतानाच 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) खड्डे व निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी चक्क निकृष्ट काम पोलीस अधिकाऱ्यांना थेट समृद्धीवर नेऊन दाखवत समृद्धीवरील निकृष्ट कामाची पोलिसात तक्रार केली. समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट बीबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर चेनेज 309 ते 310 दरम्यानच्या पूलाला मोठ भगदाड पडलं आहे . गेल्या महिनाभरापासून हे भगदड असून यामुळे आतापर्यंत पाच ते सहा अपघात झाले आहेत. मात्र हे भगदाड बुजवण्यासाठी चक्क कापडी पिशव्या व पोत्यांचा वापर करण्यात आल्याच्या बातम्या ही माध्यमातून आल्या होत्या. मात्र अद्यापही हे भगदाड बुजवण्यात आलं नाही त्यामुळे समृद्धी महामार्गावर झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे .त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
अटल सेतूला तडे, नाना पटोलेंकडून पाहणी
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अवघ्या पाच महिन्यातच पुलाला तडे गेले आहेत. अटल सेतू उलवे मधून सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये खचलेला आहे. त्याची पाहणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अटल सेतूसंदर्भात MMRDA ने केलेला खुलासा
अटल सेतूचे प्रोजेक्ट हेड म्हणाले, अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वातं असल्याचं एमएमआरडीएने म्हटलं होतं.
हे ही वाचा :