Railway Accident : ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला, फरफटत गेला, रोहा स्थानकात अंगावर काटा आणणारा अपघात
Railway Accident : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराचा अंदाज न आल्याने रोहा रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा गंभीर अपघात झालाय.
Railway Accident, रोहा : रोहा रेल्वे स्थानकावर (Roha Railway Station) अंगावर काटा आणणारा अपघात घडलाय. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरामध्ये अडकून एक प्रवासी गंभीररित्या जखमी झालाय. त्याला उपचारासाठी रोहा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहा येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. प्रेम प्रदीप कांबळे (वय 25, रा. म्हसळा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सावंतवाडी पॅसेंजरमधून पडून प्रवासी गंभीररित्या जखमी
अधिकची माहिती अशी की, रोहा रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून पडून तरुण ट्रेन व फलाटमध्ये अडकून जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा तरुणावर रोहा तालुका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिव्यावरून सावंतवाडीकडे जाणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून प्रेम प्रदीप कांबळे (वय 25) रा. म्हसळा याचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटाच्या मध्ये अडकला होता. या घटनेची माहिती मिळताच SVRSS टीम व धाटाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्लॅटफॉर्म आणि रेल्वे स्थानकामधील अंतराकडे लक्ष ठेवा, अशा सूचना सातत्याने रेल्वे स्थानकांवर देण्यात येत असतात. त्यावर लोकांनी लक्ष देणे महत्त्वाचे बनले आहे. यापूर्वीही अनेकदा रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या