Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील बळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग उपराजधानी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाचे डिसेंबर 2022 मध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.
नागपूर: समृद्धी महामार्ग उपराजधानी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाचे डिसेंबर 2022 मध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र, हा महामार्ग अपघात मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला. समृध्दी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. मात्र, आता एक दिलासादायक बाब समोर आली आहे, गेल्या दोन वर्षाच्या तुलनात्मक अभ्यास केला असता अपघाताचे प्रमाण घटल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभरात 19 टक्के अपघात घटल्याचे चित्र आहे. 33% जीवित हानी घटली आहे. जखमींची संख्या 60 टक्यांनी घटली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातात मोठी घट झाली ही मोठी दिलासादायक बाब आहे. 2023 पेक्षा 2024 मध्ये अपघाताची संख्या कमी झाली आहे. वेगवेगळ्या उपाययोजनेनंतर अपघाताचे प्रमाण घटल्याचे चित्र दिसून येत आहे.
आकडेवारी काय सांगते?
गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गावर 134 अपघात झाले आहेत, ज्यामध्ये 151 जणांचा बळी गेला आहे. यात गंभीर अपघात 81 होते. तर 42 गंभीर जखमी झाले होते. 52 लोक किरकोळ जखमी झाले होते. कोणीही जखमी न झालेल्या अपघात संख्या 14 इतकी आहे. अपघाताची प्रमाण तपासण्यासाठी RTO विभागाने दिलेल्या आकडेवारीचा आम्ही अभ्यास केला. ज्यात जानेवारी-ऑगस्ट 2023 ते जानेवारी-ऑगस्ट 2024 ची तुलना केली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट 2023 मध्ये आठ महिन्यात 103 अपघात झाले होते, यामध्ये 120 जणांचा लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यात गंभीर अपघात 63 होते. तर 30 लोक गंभीर जखमी झाले. 40 लोक किरकोळ जखमी होते. कुणीही जखमी न झालेल्या अपघात संख्या 8 इतकी होती.
जानेवारी ते ऑगस्ट 2024 मध्ये आठ महिन्यात 83 अपघात झाले, 80 जणांचा लोकांचा मृत्यू झाला होता. तर ज्यात गंभीर अपघात 57 होते. तर 39 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर 17 लोक किरकोळ जखमी झाले होते. कुणीही जखमी न झालेल्या अपघात संख्या 3 होती.
वरील आकडेवारीनुसार समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूचे प्रमाण 33 टक्क्यांनी घटलं असल्याचं दिसून येत आहे. गंभीररीत्या जखमी होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. किरकोळ जखमी होणाऱ्यांची संख्या 58 टक्क्यांनी घटली आहे. अपघाताचे प्रमाण 19 टक्क्यांनी घटले आहे.
अपघाताची संख्या घटल्याची कारणं काय?
ओव्हर स्पीडींग वाहनांवर कारवाई
बस चालकांची ड्रंक एण्ड ड्रायव्हींग मोहीमेत टेस्ट
वाहनांच्या टायरची तपासणी मोहीम
अनफिट वाहनांची वेळोवेळी तपासणी
लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई
ओव्हर स्पीडींग ड्रायव्हरची टोल प्लाझावर काऊन्सिलिंग
समृद्धीवर वाहनांची संख्या वाढल्याने चालकाचे संमोहन होत नाही
चालकाचे संमोहन टाळण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे शोभेची वस्तू लावण्यात आले
समृद्धी महामार्ग सूचना देणाऱ्या फलकांची संख्या वाढवली