माझा इम्पॅक्ट : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखं गळती प्रकरण; केंद्र सरकारकडून दखल, उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणूक
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव (Shegaon) तालुक्यातील केस गळती प्रकरणाला (Buldhana Hair Loss) आता गंभीर वळण लागलंय. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव (Shegaon) तालुक्यातील केस गळती प्रकरणाला (Buldhana Hair Loss) आता गंभीर वळण लागलंय. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे वृत्त 'एबीपी माझा' ने लावून धरले होते. अशातच आता 'माझा'च्या बातमीचा मोठा इंपॅक्ट झाल्याचे समोर आले असून या प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे.
केस गळती झालेल्या रुगानांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे. अशातच Abp माझा ने ही बातमी लावून धरल्यानंतर या बातमीची दखल घेत केंद्र सरकारच्या आकस्मित चिकित्सा राहत पथक बुलढाणा जिल्ह्यातील नखं गळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी तात्काळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी पीडित रुग्णांना या आजारपासून मुक्तता मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शेगाव तालुक्यातील 7 गावात जवळपास 80 रुग्णांचे नखं गळल्याच समोर
पुढे आलेल्या माहितीनुसार, NCDC चे अतिरिक्त संचालक डॉ. तंझिन दिकिड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस व नखं गळती भागाचा तात्काळ दौरा करण्याचा आदेश देण्यात आले आहे. हे पथक केस व नखं गळती भागाचा दौरा करून सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. सध्या शेगाव तालुक्यातील 7 गावात जवळपास 80 रुग्णांचे नखं गळल्याच समोर आल आहे. केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाथकाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य उपसंचालक आज(21 एप्रिल) या भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
GBS चा उद्रेक पाण्यामुळे नाही तर कोंबड्यामुळे, NIV च्या प्राथमिक निष्कर्षातून माहिती
पुण्यात 9 जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाला होता. त्यानंतर जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात हा उद्रेक झाला होता. पुण्यात जीबीएसचे २०२ रुग्ण आढळले होते. पाण्यामुळे जीबीएस होत असल्याचं सांगण्यात आल होतं. आता मात्र कोंबड्यांमुळे होत असल्याचं पुढे आल आहे आणि NIV ने २६ प्रकारच्या रोगकारक घटकांची तपासणी केली. खडकवासला धरणातून होत होता. niv ने आधी पाण्यामुळे होत असल्याचा निष्कर्ष काढला मात्र खडकवासला धरणाच्या परिसरात कुक्कुटपालन केंद्रे असल्याने तेथील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासले. त्या केंद्रातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळून आल्याचं समोर आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























