एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट : अखेर वेदिकाच्या गावात पोहोचले पाणी; एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, पारधी बेड्यावर सोलरच्या माध्यमातून आलं पाणी

एबीपी माझाने काठोडा गावातील वास्तव दाखवल्यानंतर आणि हंडाभर पाण्यासाठी वेदिका चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे कटू वास्तव समोर आणल्यानंतर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रशासन काल झोपेतून जागा झालं होतं.

ABP majha Impact यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या 12 वर्षीय वेदिक चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू (Vedika Chavan Death Case) झाला होता.  वेदिकाच्या दुर्दैवी मृत्यूची आणि त्यासाठी पाण्याचा दुर्भिक्ष कारणीभूत असल्याचे सत्य एबीपी माझाने दाखवल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. अशातच या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून  काठोडा या पारधी वेड्यावर अखेर पाण्याचा एक तात्पुरता का होईना मात्र स्रोत निर्माण झाला आहे. एबीपी माझाने (ABP majha Impact) काठोडा गावातील वास्तव दाखवल्यानंतर आणि हंडाभर पाण्यासाठी वेदिका चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे कटू वास्तव समोर आणल्यानंतर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रशासन काल झोपेतून जागा झालं होतं.

दरम्यान, काल (18 एप्रिल) दुपारीच सोलर प्लेट्स काठोडा गावात पोहोचवण्यात आल्या होत्या. आज त्या सोलर प्लेटच्या माध्यमातून वीज पुरवठा देऊन बंद पडलेल्या हँडपंपच्या बोरमध्ये (Bore) मोटर बसवून नळ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील महिलांना गावातच पाणी मिळण्याची सोय निर्माण झाली आहे. त्यामुळे आज जरी गावात वेदिका नसली तरी तिच्या गावातील महिला आणि मुलींना पाण्याची सोय निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या पथकाची पारधी बेड्याला भेट 

सद्यस्थितीत पारधी बेडा येथील बोअरवेलच्या सौर पंपातून पाणी पुरवठा सुरु आहे. सदर वस्तीमध्ये जलजिवन मिशन योजनेंतर्गत नव्याने 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सोलर पॅनल व पंप,उर्ध्व नलिका, वितरण व्यवस्था व घरघुती नळ जोडणीच्या कामाचा समावेश आहे. त्यापैकी वितरण व्यवस्था व नळ जोडणीचे काम पुर्ण करण्यात आले असून पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध न झाल्यामुळे काम करता आले नाही. सद्यस्थितीत पारधी बेडा वस्तीमध्ये असलेले 1 सोलरपंप व 1  हातपंपाद्वारे ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा सुरु असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व आर्णी गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

वस्तीला हजार लिटरच्या टाकीवरुन पाणी पुरवठा

यावेळी गावातील सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ व मुलीच्या वडीलांसोबत चर्चा केली असता घटनेच्या दिवशी सकाळी 8 वाजता मैत्रीणींसोबत वेदीका कपडे धुण्यासाठी अरुणावती नदीच्या काठी गेली होती. त्यामध्ये नदीतील डोहामध्ये पाय घसरुण वेदीका पडली. त्यामध्ये तिचा बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला, असे सांगितले. या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 1 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अस्तित्वात असलेल्या बोअरवेलवर 1 अश्वशक्ती क्षमतेच्या सौर पंपाद्वारे टाकी भरुन वस्तीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वस्तीत आणखी एक हातपंप असुन त्याद्वारे सुध्दा पाणी पुरवठा सुरु आहे. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

लग्नाची बारात घेऊन जात असतानाच अचानक कारमधून उतरला अन् गायब झाला; तब्बल अडीच तास शोधाशोध, थेट रेल्वेसमोर मृतदेह आढळला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Embed widget