Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: आज दुपारी 12 वाजता वरळीतील हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे. 2019 साली विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. त्यावेळी अमित शाह उपस्थित होते. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
भाजप आमदाराचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल; वर्षभरापूर्वी केली अजब 'मनोकामना', नगरपालिकेत मिळालेल्या यशानंतर केली मनोकामना पूर्ण
अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांचा नवा लूक समोर आलंय.. आमदार पिंपळे यांनी एक नवस घेतला, 'जोपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांचा विजय होणार नाही, तोपर्यंत आपण दाढी करणार नाहीयेय. अशी मनोकामना वर्षाभरापूर्वीचं भाजपचे आमदार पिंपळे यांनी घेतली.. जवळपास वर्षभरापासून पिंपळे यांनी दाढी केलीच नव्हती.. मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पिंपळे यांनी सभांचा धडाका लावला होताय.. अन अखेर मोठ्या संघर्षानंतर भाजपला मोठ यश या ठिकाणी मिळून दिलंय. नगरपालिका निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून आणले. आधी बराच पिछाडीवर असलेले त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षल साबळे 917मतांनी जिंकलेत. त्यानंतर काल आमदार पिंपळे यांनी वाढलेली दाढी काढली... आता भाजप आमदाराचे नव लूक समोर आलं, अन सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.. कार्यकर्त्यांबद्दल घेतलेली मनोकामना अर्थातच व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाली.. अन सलूनमध्ये जात दाढी काढली.. त्यांच्या या मनोकामनेची अन नव्या लुकची सध्या लोक आणि सोशल मीडियात मोठी चर्चा आहेय.
मोहाडीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील घाणीनं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात; संतप्त विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अभ्यासिका केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाण पसरल्यानं अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं हुतात्मा स्मारक इथं अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र उभारलं आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या परिसरात असलेली दुर्गंधी तात्काळ दूर करावी आणि अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ आणि सुंदर करून चांगल्या वातावरणाची निर्मिती करून द्यावी, या मागणीला घेऊन अभ्यासिकेच्या संतप्त विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलेचं धारेवर धरलं. या अभ्यासिका केंद्राच्या परिसरातचं नगरपालिका प्रशासनाच्या कचऱ्याच्या गाड्या आणि इतरही वाहनं धुतल्या जात असल्यानं तिथं पाण्याचे डबके निर्माण होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचा आरोप या संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे























