एक्स्प्लोर
Big Boss Marathi : माधव देवचकेचे वडिल म्हणतात, “माधवचा मला खूप अभिमान आहे”
'फादर्स डे' निमित्त माधवचे वडिल चारूदत्त देवचके यांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे.
चुरशीचे गेम, तुफान राडा, स्पर्धकांमधली ठसन यामुळे गाजलेल्या 'बिग बॉस मराठी'चा दुसरा सिझन दिमाखात सुरु आहे. बिग बॉसच्या घरात असलेला प्रत्येक जण या ना त्या कारणाने चर्चेत आहे. सध्या या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेची त्याच्या चाहत्यांमध्ये इमेज ‘समंजस’ बिग बॉस कन्टेस्टंट अशी आहे. त्यामुळे माधव देवचकेच्या वडिलांनीही 'फादर्स डे' निमित्त त्याची पाठ थोपटली आहे.
'फादर्स डे' निमित्त माधवचे वडिल चारूदत्त देवचके यांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आला आहे. बऱ्याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच 'माधवचे वडिल' अशी होती. मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.
‘बिग बॉस’ मधल्या माधवच्या वाटचाली विषयी त्याचे वडिल सांगतात, “बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. कुठेही पातळी न घसरू देता, आणि आपले संस्कार न विसरता तो खेळतोय, याचा मला अभिमान आहे. राग व्यक्त करतानाही तो खूप संयतपणे व्यक्त करतोय. बिग बॉस जिंकून येण्यासाठी माधवला माझ्या शुभेच्छा.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement