(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara News: भंडाऱ्यात हॉटेलिंग करणारे माकड; ऐटीत बसून मारते नाश्त्यावर ताव, दर मंगळवार, शनिवारी वेळ आणि टेबलही असतो रिझर्व्ह
Bhandara News: हॉटेलमध्ये हे माकड न चुकता आठवड्यातून शनिवार आणि मंगळवारी असं दोन दिवस सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान येते
भंडारा : घरच्या जेवणाचा कंटाळा आला की आपली पावलं आपोआप हॉटेलकडे वळतात. मात्र आता माकडंही हॉटेलींग करायला लागलंय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भंडाऱ्यातल्या (Bhandara News) मोठा बाजार परिसरात पंचभाई यांचं हॉटेल सुरेश आहे.त्यांच्या हॉटेलमध्ये एक माकड आठवड्यातून शनिवार आणि मंगळवारी या दिवशी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाश्ता करण्यासाठी येतं आणि नाश्ता करुन झाला की शांतपणे निघून जातं. बरं हे महाराज येणार म्हटल्यावर त्याचा टेबलही रिझर्व्ह असतो.
सहा ते सात महिन्यांपासून हॉटेलात येते
भंडारा शहरातील अगदी गजबजलेल्या मोठा बाजार परिसरात बबन आणि सुरेश पंचभाई यांचं हॉटेल सुरेश आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये हे माकड न चुकता आठवड्यातून शनिवार आणि मंगळवारी असं दोन दिवस सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान येते. मागील सहा ते सात महिन्यांपासून हे माकडं या हॉटेलात येते. विशेष म्हणजे त्याचा खाद्यपदार्थ खाण्यासाठी बसण्याचा टेबल आणि वेळ जणूकाही आरक्षित असल्यासारखी आहे. तो त्याच वेळेत आणि त्याच टेबलावर बसून नाष्टा करतो. पाणी पितो आणि निघून जातो.
शनिवार आणि मंगळवार ठरलेले वार
मागील अनेक महिन्यांपासून माकडाचा हा नित्यक्रम सुरू असल्यानं हॉटेल मालकही त्याच्या वेळेत त्याच्या टेबलावर दुसऱ्या कुणालाही बसू देत नाही. शनिवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस पवनसुत हनुमान यांचा दिवस म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळं या दोन्ही दिवशी माकडं हॉटेलात येत असल्यानं तो आला की, हॉटेल मालक मोठ्या भक्तिभावाने त्याची अगदी आवडती जिलेबी सोबत समोसा, शेव, पापडी, पेढा आणि भिजवलेला चना हे त्याचं पदार्थ खायला देतात.
माकडाची आता सर्वत्र जोरदार चर्चा
जोपर्यंत या माकडाचं पोट भरत नाही तोपर्यंत हे माकडं टेबलवरून खाली उतरत नाही. हॉटेल मालक देखील तेवढ्याच प्रेमाने त्याला खाद्य पदार्थ देतात. हे सर्व पदार्थ खाऊन पोट भरलं की तो पाणी पिल्यावरचं निघून जातो. मर्कट लिलांमुळे अनेकजण त्रस्त होत असल्याचं चित्र बघायला मिळतं, मात्र भंडाऱ्यातील हॉटेलिंग करणारा माकडं आठवड्यातून दोन वेळेस येत असला तरी, त्याचा कुठलाही त्रास हॉटेल मालक किंवा येथील ग्राहकांना आतापर्यंत झालेला नाही. विशेष म्हणजे या माकडाची आता सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा :