एक्स्प्लोर

Bhandara Food Grain Scam Case : 12.50 कोटींच्या धान घोटाळ्यात भंडाऱ्यात सात जणांना अटक; आरोपींमध्ये अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा समावेश

Bhandara News: भंडाऱ्यातील धान घोटाळा प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या भावाचाही समावेश आहे.

Bhandara Food Grain Scam Case : भंडारा : भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) भात पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. पण तेवढेच घोटाळे देखील बाहेर येत आहेत. सहा राईस मिलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या धान खरेदी प्रकरणात अपहार झाल्याचा आरोप सध्या केला जात आहे. तसेच, याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला. सीबीआयच्या तपासात 12.50 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे, यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुमसरचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्या भावाचा ही अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचं कागदोपत्री दाखवून शासनाला तांदूळ परत न दिल्याचं आणि शेतकऱ्यांचे खोटे सातबारा आणि खोटी बिलं जोडून अपहार केल्याचं हे प्रकरण आहे. तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी 2018 मध्ये याप्रकरणी सीआयडीकडं तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. या सर्वांवर कलम 120 (ब), 406, 409, 420, 434, 465, 467, 468, 471 भादंवि नुसार वरठी पोलिसांत गुन्हे दाखल होते. त्या अंतर्गत या सर्वांना अटक करण्यात आली. 

प्रकरण नेमकं काय? 

भरडाईसाठी जिल्ह्यातील सहा राईस मिलकडं धान दिल्याचं कागदोपत्री दाखविण्यात आलं होतं. भरडाईनंतर तांदूळ शासनाकडं परत न करता खोटी बिलं जोडून शेतकऱ्यांच्या नावे रकमेची उचल करण्यात आली होती. हा घोटाळा 12.50 कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही राईस मिल चालकांनी 8.50 कोटी रुपयांचा धान शासनाकडं जमा केल्याचं तपासात आढळून आलं. यात मोहाडी तालुक्यातील सहा राईस मिलचा समावेश आहे. या राईस मिलशी संबंधित असलेली मोहाडी, तुमसर आणि भंडारा तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्रांचे संचालक महेश मनोहर कहालकर, (35) बाम्हणी, ता. तुमसर, सुरेंद्र विठोबा वहीले, (51) मांढळ, ता. तुमसर, ताराचंद कवडू कहालकर (65) बाम्हणी, ता. तुमसर, भारत ज्ञानीराम ठाकरे (58) श्रीरामनगर तुमसर, रामलाल संपत बांडेबुचे (55) सुकळी, ता. तुमसर, माणिक श्रीराम बोंदरे (65), ढोरवाडा, ता. तुमसर यांचा समावेश आहे. तर राईस मिल मालक विश्वनाथ माणिकराव कारेमोरे (43) वरठी) असं अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावं आहेत. विश्वनाथ कारेमोरे हे आमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ असून ते मोहाडी तालुक्यातील एकलारी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget