एक्स्प्लोर

Bhandara News : तब्बल चार दशकानंतर हरितक्रांतीची स्वप्नपूर्ती, भंडारा जिल्ह्यातील नेरला उपसा सिंचन योजना पूर्ण 

गोसीखुर्द धरणाची संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना (Nerla Upsa Irrigation Scheme) जवळपास पूर्ण झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडण्यात आलं आहे.

Bhandara News : तब्बल 40 वर्षांपासून निर्माण कार्य सुरु असलेला भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण (Gosekhurd Dam) लवकरच पूर्ण होणार आहे. गोसीखुर्द संदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. गोसीखुर्द धरणाची संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना (Nerla Upsa Irrigation Scheme) जवळपास पूर्ण झाली असून, अधिकाऱ्यांनी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडलं आहे. यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना (Farmers) सुखावणारी बाब म्हणजे, सोडलेलं पाणी 50 किमी लांब असलेल्या अंतिम गावापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चार दशकानंतर दारी पोहोचलेल्या पाण्यामुळे सुखावले आहेत. 

1984 मध्ये राजीव गांधींच्या हस्ते गोसीखुर्द धरणाची पायाभरणी

गोसीखुर्द धरणाची ( (Gosekhurd Dam) पायाभरणी 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हस्ते झाली होती. तर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात ही 22 एप्रिल 1988 मध्ये झाली होती. या धरणाची सुरुवातीची किंमत ही 388 कोटी रुपये होती. तर धरणाची आताची किंमत ही 20 हजार कोटी रुपये आहे. ओलिताखाली येणारं क्षेत्र हे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढं आहे. 

मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार

नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे. या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, येथील बागायती शेती होणार आहे. ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली आहे. ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जल सिंचन योजना आहे. 

कोरडवाहू शेती बागायती होणार 

नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला होता. कारण या भागात पाण्याची टंचाई होती. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bhandara News : खोदकाम एकाच्या शेतात, मोबदला दुसऱ्याला; गोसीखुर्द धरण प्रशासनाचा भंडाऱ्यात अजब कारभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Embed widget