Pankaja Munde : पाच वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची; पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत
Pankaja Munde Speech : एका कार्यक्रमात बोलतांना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहे.
Pankaja Munde Speech : पाच वर्षांचा वनवास भोगला, आता स्वाभिमानाची लढाई लढायची असल्याचे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याचे संकेत दिले आहे. बीडच्या (Beed) शिरूर तालुक्यातील जाटवड येथे गोपीनाथ गड उभारण्यात आला असून, या गोपीनाथ गडाचे अनावरण भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेला कार्यक्रमात बोलतांना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, “पूर्वी 14 वर्ष वनवास असायचा. मात्र, कलियुगामध्ये मी पाच वर्ष वनवास भोगला असून, आता हा वनवास नको आहे. आपल्याला स्वाभिमानाची लढाई लढायची असून, तुम्ही या लढाईत मला साथ द्या असं म्हणत आता मी मैदानात उतरले असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्यात. कलियुगाच्या राजकीय युद्धामध्ये आपण सोबत लढाई लढू असं वचन देखील पंकजा मुंडे यांनी उपस्थितांकडून घेतलं.
संघर्ष यात्रा काढून मी सर्वात मोठे योगदान दिलं...
मुंडे साहेबांवर जनतेचे प्रेम अतूट होतं. त्यामुळे मी गोपीनाथ गड उभा केला. हा गड कुण्या महंतांचा नाही, हा गड जनतेचा आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी संघर्ष यात्रा काढून, मी सर्वात मोठे योगदान दिलं असे पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यातले सगळे राजकीय नेते गोपीनाथ गडावर येऊन गेले, मात्र, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा योग अजून आला नाही. मला गोपीनाथ गडावरून राजकारण देखील करायचे नसल्यास पंकजा मुंडे म्हणाल्या.
राजकारणात आता कोणीही येतं आणि जॅकेट घालून उभा राहतात...
मुंडे साहेबांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी निवडणूक लढवल्या ते आता आपल्यासोबत आहेत. मला राजकारणामध्ये मेरिटवाले आणि काम करणारे लोकं लागतात. पण, आता कोणीही येतं आणि जॅकेट घालून उभा राहतात. मी राजकारणात येऊन लगेच नेता झाले नाही. 2004 पासून मी यामध्ये काम करते. वीस वर्षाच्या संघर्षातून मी नेता झाले. निवडणुकीत पडल्यानंतर मी जास्त मोठी झाली. वीस वर्षाच्या राजकारणात मी कोणाची एक रुपयाची ही मिंदी नसल्याचं पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं.
अन् दोन तलवारी हातात आल्यासारखं वाटतं
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंकजा मुंडे पोहोचल्या, त्यावेळी डीजेवर पंकजा मुंडे यांचे गाणे लावण्यात आले होते. यावेळी यावरच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, जेव्हा माझ्या नावाचं गाणं लागतं तेव्हा आपोआप अंगातच येतं आणि दोन तलवारी हातात आल्यासारखं वाटतं. एवढा मोठा ओझं सहन करणे हे साध्या लोकांचे काम नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपले दोन गाणे देखील म्हणून दाखवले.
इतर महत्वाच्या बातम्या :