एक्स्प्लोर

बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; पेट्रोल ओतून एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न

Beed News : चालक आणि मेकॅनिकने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत एसटी बसचं (ST Bus) नुकसान झालं असून बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या आहेत. 

Beed News : बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha  Reservation) प्रश्न अजून कायम आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 17 सप्टेंबरपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशातच, बीडमध्ये (Beed News) गुरुवारी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. बीडमध्ये तीन अज्ञातांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न केला. चालक आणि मेकॅनिकने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत एसटी बसचं (ST Bus) नुकसान झालं असून बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या आहेत.           

बीडच्या घोडका राजुरीजवळ एका एसटी बससमोर अचानक तीन अज्ञात लोकांनी कार आडवी लावली. त्यानंतर एसटी बसमधून चालक आणि मेकॅनिकला खाली उतरवलं, त्यानंतर त्या तिघांनी एसटी बसमध्ये पेट्रोल ओतलं आणि बसमधील सीट पेटवले. संबंधितांनी या वेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, चालक आणि मेकॅनिकनं प्रसंगावधान राखून आग विझवली. तोपर्यंत बसमधील 4 सीट जळून खाक झाल्या होत्या.

नेमकं काय घडलं? 

बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथे मुक्कामी असलेल्या बसमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बीड आगारातील मेकॅनिक उत्तम राऊत आणि राम कुलथे हे हिवरापहाडी येथे आगाराची बस घेऊन दुरुस्तीसाठी निघाले होते. बीड परळी रोडवर घोडका राजुरी येथील तलावाजवळ बस आल्यानंतर, मागून एक विनाक्रमांकाची कार त्यांच्या बससमोर येऊन थांबली याच वेळी कारमधून उतरलेल्या तीन तरुणांनी बसमध्ये प्रवासी आहेत का, याची विचारणा केली. बस दुरुस्तीसाठी जात असल्याचं राऊत यांनी या तरुणांना सांगितलं. त्यांनी राऊत, कुलथे यांना बसच्या खाली उतरवून आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणून 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. आणि एसटी बसमध्ये घुसून पेट्रोल शिंपडू लागले. 

तसेच, कारमधून पेट्रोलची बाटली काढून एक तरुण बसमध्ये चढला. त्यानं सीटवर पेट्रोल ओतलं, दुसऱ्यानं बाहेरून बसमध्ये काडी पेटवून टाकल्यानं सीट पेटलं. राऊत, कुलथे यांनी जवळच रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून टाकीतून पाणी आणून ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत चार ते पाच सीट जळून 10 हजारांचं नुकसान झालं. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget