एक्स्प्लोर

Ketaki Chitale on Marathi: मराठी बोलून किंवा न बोलून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही; केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, संदीप देशपांडे म्हणाले...

Ketaki Chitale & Sandeep Deshpande: केतकी चितळे हिने मराठी भाषेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे मनसे आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Ketaki Chitale and Sandeep Deshpande: सध्या राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार विरोध केला होता. यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला होता. तेव्हापासून मुंबईसह राज्यात मराठीचा (Marathi Language) मुद्दा तापला आहे. अशातच या वादात वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने उडी घेतली होती. 'मराठी न बोलल्याने अंगाला भोकं पडतात का', असा प्रश्न तिने मराठीचा आग्रह धरणाऱ्या संघटनांना विचारला होता. त्यामुळे मनसे आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना केतकी चितळे हिच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर संदीप देशपांडे यांनी केवळ एका वाक्यात हा विषय संपवला. 'मला फक्त चितळ्यांची भाकरवडी माहिती आहे', असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Ketaki Chitale: केतकी चितळे मराठी भाषेबद्दल नेमकं काय म्हणाली?

"आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो 2024 मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिक सांगायचं झालं तर, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या...", असं केतकी चितळे म्हणते. "एकाने मला असंही सांगितलं, माझ्या जवळच्या व्यक्तीने; त्याने मला सांगितलं की, हिंदी आणि उर्दूलासुद्धा दर्जा नाहीये. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे." 

"माझं असं झालं की, ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त इंसिक्योरिटी वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, त्यामुळे इंसिक्योरिटी आणखी वाढते." असं म्हणत तिने मराठी भाषिकांच्या मागणीलाच 'असुरक्षिततेचं' प्रतीक ठरवलं आहे. "मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इंसिक्योरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.", असं केतकी चितळे म्हणाली. 

दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळला आहे. मायबोली मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकवटला असून भाषा टिकवण्यासाठी सगळे एकजुटीनं उभे ठाकले आहेत. अशातच स्वतः मराठी असूनही केतकीनं मराठीबाबत जी मोठी गरळ ओकली आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. 

आणखी वाचा

हिंदुत्वाची लढाई, वोट जिहादचा मुद्दा; मतदानानंतर केतकी चितळेचा व्हिडीओ चर्चेत

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Embed widget