एक्स्प्लोर
Beed Crime News: बीडमधील मारहाणीच्या घटना सुरूच; दोघांनी एका तरूणाला लाकडी दांडकं तुटेपर्यंत हाणलं अन्... घटनेचे फोटो समोर
Beed Crime News: लाकडी दांड्याने तरुणाला मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरूच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
Beed Crime News
1/6

गेल्या काही दिवसांंमध्ये बीडमधील भयानक वास्तव समोर आलं होतं, मोठ्या प्रमाणावर मारहाणीच्या घटना त्याचे व्हिडीओ समोर आले होते, त्यानंतर पुन्हा एकदा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत.
2/6

बीडमध्ये मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करत, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कायम सुरू आहे.
3/6

बहिरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होतोय. आकाश माने या तरुणाला फरार आरोपींकडून मारहाण करण्यात आली.
4/6

मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु काही केल्या बीड मधील मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये.
5/6

पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. मात्र सतत काही ना काही कारणास्तव मारहाण होणे आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करणे हा ट्रेंड बनल्याचे दिसून येतंय.
6/6

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोघांना एका तरूणाला लाकडी दांडकं मोडेपर्यंत मारहाण केल्याचं दिसून येत आहे, या घटनेनं पु्न्हा संताप व्यक्त केला जात आहे.
Published at : 19 Jul 2025 08:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























