एक्स्प्लोर

Onion: कांद्याला भाव मिळत नसल्याने बीडमध्ये कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंबीयांचा आरोप

Onion : तीन एकरावर कांद्याची लागवड केली पण त्यातून उत्पादन खर्चही मिळाला नाही, त्यामुळे अंगावर असलेलं साडेतीन लाखाचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

बीड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अधिक विदारक होताना दिसत आहे. त्यावर राज्य सरकारने मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप त्यावर कारवाई होत असल्याचं दिसून नाही. बीड तालुक्यातल्या बोरखेड येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर (वय वर्ष 25) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

आत्महत्या केलेल्या या तरुण शेतकऱ्याने तीन एकरावर कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याच्यावर असलेलं साडेतीन लाख रुपयांच कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता आणि याच विवंचनेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलंय. त्याच्या पाश्चात आई, वडील आणि एक भाऊ असून कुटुंबाचा करता आधारच गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

नाफेडच्या कांदा खरेदीचा कुणाला फायदा?

कांद्याच्या दरावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापलं असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं. कांदा दरात किंवा नाफेडच्या खरेदीत कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना मिळून आलं नसल्याचे चित्र आहे आणि त्याचमुळे शेतकरी अद्यापही संतप्त आहेत. गेल्या वर्षी कांद्याला जो भाव मिळत होता त्याच्या अर्ध्यावर यंदा भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. त्यात नाफेड कांदा खरेदी करत असल्याचं कुठेही दिसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नाफेडनी कांदा खरेदी करुन गेल्या पाच वर्षात किती निर्यात केला असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होताना दिसत आहे. नाफेडकडून बाजार समितीमध्ये येऊन कांदा खरेदी केला पाहिजे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा  कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळं वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळं एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळं पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget