एक्स्प्लोर

बचतगट-फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; महिलेने संपवली जीवनयात्रा

Beed News : याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News : बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बचतगट-फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी धमक्यांना कंटाळून महिलेने आत्महत्या (Suicide) केली आहे. या महिलेने विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फैमिदा अलीम शेख (वय 39, रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई)  असे मयत महिलेचे नाव आहे. 

फैमिदा यांची मुलगी सुमेरा अफरोज शेख हिच्या फिर्यादीनुसार, फैमिदा यांनी घरगुती कामांसाठी विविध बचत गट आणि फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते. या कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बचत गटाच्या रेश्मा शेख, सलमा युसुफ पठाण, शमीम खतीब (तिन्ही रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई), नसरीन जिलानी शेख, जकीय महबूब महबूब (दोन्ही (दोन्ही रा. आकाशनगर), हीना शेख (रा. लालनगर) आणि सूर्योदय फायनान्सचे कर्मचारी यांनी फैमिदा यांच्याकडे सतत तगादा लावला. त्यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि घरातील सिलेंडरही उचलून नेले. अखेर सततच्या तगाद्याला त्रासलेल्या फैमिदा यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.

फैमिदा यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार सुरु असताना फैमिदा यांचे निधन झाले. त्यामुळे मुलगी सुमेराच्या फिर्यादीवरुन सात जणांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

कोणावर काय आरोप? 

  • रेश्मा शेख (रा.क्रांतीनगर अंबाजोगाई) यांनी फैमिदा यांना पाच हजार रुपये व्याजाने दिले होते. पैसे दिल्यापासून पंधरा दिवसांनी रेश्मा यांनी फैमिदा यांना शिवीगाळ करुन नऊ हजार रुपये वसुल केले आहेत.
  • सलमा युसूफ पठाण (रा. क्रांतीनगर अंबाजोगाई) यांच्याकडून बचत गटाचा राहीलेला एक हप्ता का भरला नाही असे म्हणून धमक्या देण्यात येत होत्या. मुलीच्या लग्नासाठी गट उचलला पैसे भरणे होत नाहीत तर मुलीचे लग्नासाठी गट का उचलला, गट भरला नाहीतर मी तुमच्या घरातील सामान घेऊन जाईन अशी धमकी सलमा या फैमिदा यांना देत होत्या.
  • नसरीन जिलानी शेख (रा. आकाशनगर) यांनी बचत गटाचे हप्ते भरले नसल्याने फैमिदा यांच्या घरी वांरवार येऊन शिवीगाळ केली. तसेच पैसे नाही दिले तर घरातील सामान घेऊन जाईन अशी धमकी दिली.
  • हिना शेख (रा. लालनगर, अंबाजोगाई) यांनी फैमिदा यांना व्याजाने पंधरा हजार रुपये दिले होते. पैसे परत केल्यावर देखील आणखी तीस हजार बाकी असल्याचा तगादा हिना यांच्याकडून लावला जात होता. तर पैसे न दिल्यास घरातील सामान उचलून नेण्यात येईल अशा धमक्या हिना यांच्याकडून फैमिदा यांना मिळत होत्या.
  • शमीम खतीब (रा.क्रांतीनगर अंबाजोगाई)  यांनी अडीच हजार रुपये व्याजाने देऊन आठ दिवसांत आठ हजार रुपये परत करण्याची मागणी केली. तसेच पैसे न दिल्याने एच. पी. कंपनीची गॅसची टाकी घेऊन गेली.
  • जाकिया महेबुब (रा. आकाशनगर, अंबाजोगाई) यांनी फैमिदा यांना दहा हजार रुपये व्याजाने दिले होते. त्या बदल्यात तीस हजार रुपये वसूल केले. मात्र त्यानंतर देखील व्याजाचे पैसे शिल्लक असल्याचे सांगत धमक्या दिल्या. सोबतच तू विष पिण्याचे सोंग केल्यास तुला दोन हजार रुपये देते आणि आपले बचत गट रद्द होईल असे सांगितले.
  • तसेच सूर्योदय फायनान्सचे कर्मचारी हे घरी येऊन तुम्ही बचत गटाचे हप्ते भरा, नाहीतर फाशी घेऊन मरुन जा अशी धमकी दिली. त्यामुळे वरील सर्व लोकांनी व्याजाच्या पैशांसाठी व बचतगटाच्या पैशांसाठी मानसिक त्रास दिल्याने मी विष प्राशन केल्याचं आपल्या आईने मला मृत्यू होण्यापूर्वी रुग्णालयात सांगितले असल्याचं फैमिदा यांची मुलगी सुमेरा हिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

धक्कादायक! सामूहिक बलात्काराने बीड हादरलं, आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget