एक्स्प्लोर

धक्कादायक! सामूहिक बलात्काराने बीड हादरलं, आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार

Beed Crime News : पीडितेच्या फिर्यादिवरून माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार करत त्याचा व्हिडीओ (VIDEO) तयार केला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी तिच्यावर 2014 ते 2021 अशी सात वर्षे आळीपाळीने अत्याचार केला. मात्र त्यानंतर आता पुन्हा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने हतबल झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडितेच्या फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती तिची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एका खोलीवर बोलावले. महिला तिथे आल्यावर पिंपळे याने तिच्यावर अत्याचार केला. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे पुढे त्याने त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर पुढे गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला.

महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार 

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गोरख इंगोले याने 2020 मध्ये जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरुड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तिथे गेल्यावर त्याच्या 4 मित्रांकडून महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान महिला गर्भवती राहिली. त्यामुळे गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. नेहमीच्या या सर्व अत्याचाराला कंटाळून पीडित महिला माजलगावला आली. तिथे एका हॉटेलमध्ये नोकरी करु लागली. पण येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तर संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Pune Crime News : पुणे हादरलं! बसमध्ये ओळख, धमक्या अन् लॉजवर नेत केला वारंवार लैंगिक अत्याचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget