Aurangabad: आमदार धस यांच्याविरोधात दरोड्याचे कलम वाढवा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
Aurangabad: सुनावणीवेळी न्यायालयाने आमदार सुरेश धस यांच्यासह इतर 26 जणांना प्रतिवादी करून नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे.
![Aurangabad: आमदार धस यांच्याविरोधात दरोड्याचे कलम वाढवा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल maharashtra News Aurangabad News Extend robbery clause against MLA Dhas Petition filed in Aurangabad Bench Aurangabad: आमदार धस यांच्याविरोधात दरोड्याचे कलम वाढवा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/d164e2a5d56e154f4026d1d3440ba378166174616620089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: यापूर्वी पोलिसात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध दरोड्याचे कलम (395) समाविष्ट करण्यासह तपास सीआयडीकडून करण्याबाबतची मागणी करणारी फौजदारी रीट याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आली असून, सुनावणीवेळी न्यायालयाने आमदार सुरेश धस यांच्यासह इतर 26 जणांना प्रतिवादी करून नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे.
काय आहे प्रकरण...
माधुरी चौधरी यांनी 23 जुलै 2021 रोजी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आमदार सुरेश धस व इतर 36 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. ज्यात आमदार धस आणि त्यांच्या साथीदारांनी माधुरी चौधरी यांच्या मालकीचे गट क्र. 597 मधील दोन मजली घर व संरक्षक भिंत जेसीबीने पाडले होते. ज्यात त्यांचा 30 ते 40 लाखांचा नुकसान झाले आहे. तसेच घरातील इतर सामान व दहा ते पंधरा लाख रुपये चोरून नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. सोबतच जिवे मारण्याच्या उद्देशाने वाहनावर दगडफेक केली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी विविध कलमांखाली आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
न्यायालयाने दिले नोटीस बजावण्याचे आदेश
माधुरी चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्या. विभा कंकणवाडी व न्या. राजेश पाटील यांनी आमदार सुरेश धस आणि इतर 26 जणांना प्रतिवादी करून नोटीस बजावण्याचे आदेश दिले.ज्यात राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, सीआयडीचे अपर पोलिस महानिरीक्षक सीआयडी, बीडचे पोलिस अधीक्षक, स्थानिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
तपास सीआयडीकडून करण्याची मागणी...
माधुरी चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत या सर्व प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. तर आमदार सुरेश धस यांच्याविरोधात यापूर्वीच खंडपीठाने 395 कलम समाविष्ट करण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे आष्टी पोलिसांनी कलम वाढवलेही होते. मात्र तपासात दरोड्यासारखी कृती घडली नसल्याचे वाढवण्यात आलेले कलम 395 वगळण्यात आले. त्यामुळे चौधरी यांनी पुन्हा फौजदारी रिट याचिका दाखल करत, पोलिसांनी राजकीय दबावापोटी दरोड्याचे 395 कलम वगळल्याचा आरोप माधुरी चौधरी यांनी याचिकेतून केला आहे.
महत्वाच्या बातम्या...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)