Shubman Gill Fight With Zak Crawley: भारताच्या 10 खेळाडूंनी घेरलं, क्रॉली बोलताच शुभमन गिल अंगावर धावला; 6 चेंडूत सगळं बदललं, VIDEO
Shubman Gill Fight With Zak Crawley: इंग्लंडला अखेरच्या दिवशी फलंदाजीला उतरावं लागलं. 2 षटकं नक्कीच होऊ शकली असती, पण बुमराहचं एक षटकंच पूर्ण झालं, याशिवाय मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

England vs India 3rd Test Day: भारतीय संघ लॉर्ड्स कसोटीच्या (England vs India 3rd Test) तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 387 धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडने देखील पहिल्या डावात 387 धावाच केल्या आहेत. यासह पहिल्या डावात दोन्ही संघांना बरोबरीत धावा केल्या. भारताचा संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या अवघी 6 मिनिटं आधी सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या दिवशी फलंदाजीला उतरावं लागलं. 2 षटकं नक्कीच होऊ शकली असती, पण बुमराहचं एक षटकंच पूर्ण झालं, याशिवाय मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
One of the best pictures from Day 3 at Lord's. 🤣
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2025
- A super Sunday on. (📸 - Alex Davidson). pic.twitter.com/hkU7AtjvQ6
तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकांत नेमकं काय घडलं?
लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी 6-7 मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणं भाग होतं. इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची जोडी फलंदाजीला उतरली. तर भारताकडून बुमराह गोलंदाजीसाठी आला. साहजिक जास्त षटकं होऊ नये म्हणून इंग्लंडचा संघ रडीचा डाव खेळणार याची अपेक्षा होती. पण यामुळे मैदानावर मोठा वाद झाला. भारताचे 10 खेळाडू क्रॉलीच्या जवळ गेले. तसेच मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी, केएल राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा कर्णधार शुभमन गिलसह इंग्लंडच्या फलंदाजाला भिडताना दिसले.
THE FINAL OVER DRAMA BETWEEN INDIA AND ENGLAND.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2025
- Sunday will be lethal at Lord's. 🔥pic.twitter.com/zGuoUvMN9e
राहुलचं शतक, रवींद्र जडेजाचं अर्धशतक-
तिसऱ्या दिवशी, भारताने 145/3 वरून खेळायला पुढे सुरूवात केली. केएल राहुल आणि पंत यांच्यात एकूण 141 धावांची भागीदारी झाली, दरम्यान, पंत निष्काळजीपणे धावत असताना 74 धावांवर धावबाद झाला. त्याच्या नंतर काही वेळातच, केएल राहुल देखील बाद झाला, ज्याने शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. राहुल 100 धावा केल्यानंतर बाद झाला. भारताचा अर्धा संघ 254 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, परंतु टीम इंडिया फलंदाजी क्रमवारीत सखोल नियोजनासह खेळत आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. नितीशची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. सुंदर आणि जडेजा यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली. तर रवींद्र जडेजा 72 धावा करून बाद झाला.





















