एक्स्प्लोर

Kundlik Khande Arrested: बीडमधील कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खांडे यांना अटक; प्रकरण नेमकं काय?

Beed News: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी 307 चा गुन्हा कुंडलिक खांडे यांच्यावर दाखल होता.

Kundlik Khande Arrested: बीड : बीड (Beed) लोकसभा निवडणुकीतील (Beed Lok Sabha Election 2024) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना आपण कशाप्रकारे मदत केली, असा संवाद असलेली ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) व्हायरल झाली आणि एकच गोंधळ झाला. याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खाडे यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक एका वेगळ्याच प्रकरणात झाली आहे. दोन महिन्यापूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांना ही अटक झाली आहे. 

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी  307 चा गुन्हा कुंडलिक खांडे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आजच बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला होता, त्यानंतर बीड एलसीबीनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऑडिओ व्हायरल प्रकरणी कुंडलिक खांडे चर्चेत होते. 

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी कुंडलिक खांडेविरोधात गुन्हा दाखल 

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण व्हायरल झाल्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंना निवडणुकीत मतांसह पैशांची मदत केल्याची कबुली त्यांनी दिली होती. यानंतर आता त्यांच्यावर परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

प्रकरण काय? 

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली  कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूकVidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
Embed widget