एक्स्प्लोर

OBC Reservation: सगेसोयरेचा जीआर काढलात, ओबीसी आरक्षणाला विरोध केलात तर विधानसभा निवडणुकीत पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

Maharashtra Politics: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. प्रकाश शेंडगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

बीड: राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत 'चुन चुन के गिरायेंगे' असा निर्वाणीचा इशारा ओबीसी (OBC Reservation) नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी सांगितले. ते शनिवारी बीडमध्ये (Beed News) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली.

राज्य सरकार हे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. या मुद्द्यावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही. जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की,  ओबीसी उपोषणाचा (OBC hunger strike) हा वणवा राज्यभरात पेटेल. ओबीसी आरक्षणावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. 

लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याशी फोनवर संवाद साधला. प्रकाश शेंडगे जालन्यातील उपोषणस्थळी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात संवाद झाला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याची ग्वाही  दिली. मात्र, आपल्याला याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी  लक्ष्मण हाके यांनी केली. आता ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

राज्य सरकार ओबीसींना दुय्यम वागणूक देतं, लक्ष्मण हाकेंचा आरोप

राज्य सरकार ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी नुकताच केला होता. राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी समाजाकडून यापूर्वी तीन आंदोलन करण्यात आली. मात्र, शासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, याचे आम्हाला दुःख असून शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला.

आणखी वाचा

आम्हाला नोटिस दिली तशीच जरांगे पाटील यांना दिली का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget