(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake : आम्हाला नोटिस दिली तशीच जरांगे पाटील यांना दिली का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले...
Laxman Hake : शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
OBC leader Laxman Hake : ओबीसी आरक्षण बचावसाठी (OBC Resrvation) आजपासून अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मात्र त्यापूर्वीच लक्ष्मण हाके यांना (OBC leader Laxman Hake) पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. मात्र लक्ष्मण हाके आपल्या आंदोलनावर ठाम असून सकाळी अंबड कडे बैठकीसाठी रवाना झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Resrvation) रक्षणासाठी लक्ष्मण हाके हे प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत, त्यासाठी अंबड येथे बैठक पार पडणार आहे.
अशातच शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ओबीसीची यापूर्वी तीन आंदोलन झालीत. मात्र, शासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, याचे आम्हाला दुःख असून शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. परिणामी आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून उपोषणाच्या आंदोलनापासून तसूभर सुद्धा बाजूला हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे नेमकं काय होत याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देतंय- लक्ष्मण हाके
राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. मात्र, शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि सनदशील मार्गाने आम्ही उपोषण करतोय, हातामध्ये काठ्या, कुराडी घेऊन आंदोलन करत नाहीये. ओबीसीची यापूर्वी तीन आंदोलन झालीत. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही याचे आम्हाला दुःख आहे. त्यामुळे शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचे उघड आहे. ओबीसी बांधवांमध्ये आज बैठक होईल. त्यामध्ये आम्ही धोरण ठरवू, असे म्हणत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून उपोषणाच्या आंदोलनापासून तसूभर सुद्धा बाजूला हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे.
आम्हाला नोटीस दिली तीच जरांगे पाटीला दिली का? - लक्ष्मण हाके
ओबीसींचा आवाज दाबण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे. आजघडीला आंतरवाली सराटीमध्ये 60 टक्के ओबीसी लोक आहेत. शासनाने मराठा समाजाला काय सल्ले दिले, काय आश्वासन देतात, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. मात्र, या महाराष्ट्रात 50 ते 55% पेक्षाही जास्त असलेल्या ओबीसींच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके आंदोलनावरती, उपोषणावरती ठाम आहे. जी आम्हाला नोटीस दिली तीच जरांगे पाटील यांना नोटीस दिली का, याचं उत्तर शासनाने द्यावं. आमच्याशी जशी शासनाची वागणूक आहे तशी त्यांच्या बाबतीत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या