एक्स्प्लोर

Dhananjay Munde: "मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर..."; छगन भुजबळांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी

Death Threat To Dhananjay Munde : नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी.

Death Threat To Dhananjay Munde: मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील (Shinde - Fadnavis - Pawar Government) आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील (Parali) घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमती फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली. धनंजय मुंडे यांच्या बीडमधील परळी येथील निवासस्थानी असलेल्या लँडलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. 

ज्या व्यक्तीनं धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी फोन केला होता. त्यानं सांगितलं की, "मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. मला तुम्ही 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडेंना जीवे मारिन." दरम्यान, असाच धमकीचा फोन मंत्री छनग भुजबळ यांनाही आला होता. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यानं छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भुजबळांना धमकी देणारा अटकेत 

छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhagan Bhujbal Death Threat : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget