Beed Crime News: शिव्या दिल्या; दुचाकीची चावी घेतली, राग आला म्हणून भोसकले, चाकू छातीत अडकला अन् मूठ बाहेर पडली, मध्यरात्रीच्या सुमारास बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. यातील आरोपी हा पाटोदा तालुक्यातील डोंगरात लपलेला असताना त्याला पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे.

बीड: पाच मित्रांनी सोबत फिरत होता. त्यानंतर त्यातील काही जणांनी दारूचं सेवन केले. आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हे सर्व महाराणा प्रताप चौकात गेले. तेथे मयताने आरोपीच्या दुचाकीची चावी घेतली. आईवर शिवीगाळ केली. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने दुचाकीला अडकवलेला चाकू मयताच्या छातीमध्ये खुपसला. हा चाकू त्याच्या शरिरामध्येच अडकून राहिला आणि मुठ तुटून बाहेर आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. यातील आरोपी हा पाटोदा तालुक्यातील डोंगरात लपलेला असताना त्याला पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे.
विजय सुनील काळे (वय २७ रा. धारूर, ह. मु, स्वराज्य नगर, बीड) असे मयताचे नाव असून, अभिषेक राम गायकवाड (वय ३० रा. बीड) असे आरोपीचं नाव आहे. दोघेही इतकेही जवळचे मित्र नाहीत. परंतु, विजय ज्या मित्रांसोबत होता, ते अभिषेकचे मित्र आहेत. विजय, अभिषेक आणि इतर तिघे हे महाराणा चौकामध्ये गेले. तेथे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विजयने अभिषेकला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. याचा राग अभिषेकला आला. त्याने लगेच दुचाकीवरील चाकू काढत विजयच्या छातीत डाव्या बाजूला खुपसला. यावेळी तो जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर इतर मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुनील काळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
घटनेनंतर आत्याकडे मुक्काम, सकाळी जाऊन डोंगरात लपला
अभिषेक गायकवाड खून करून अभिषेकने मित्राची दुचाकी घेऊन पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील आत्याचं गाव गाठलं. तेथे दुचाकी लपवून मुक्काम केला. सकाळी तो परिसरातील डोंगरात जाऊन लपला. हीच माहिती पोलिसांना मिळाली आणि सापळा लावून त्याला पकडण्यात आलं.
विजय कुख्यात गुन्हेगार सनी आठवलेचा समर्थक
विजय काळे विजय हा कुख्यात गुन्हेगार सनी आठवलेचा समर्थक आहे. त्याने आपल्या छातीवर सनीचा फोटोदेखील गोंदवला आहे. तसेच खून होण्यापूर्वी त्याचा एक डान्स करतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चाकू छातीत अडकला, मूठ बाहेर पडली
अभिषेक हा उंच आणि मजबूत आहे. त्याने मारलेला चाकू विजयच्या छातीत आरपार घुसला होता. त्याला तसेच जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले. अपघात विभागातून शस्त्रक्रियागृहात त्याला नेण्यात आले. परंतु, रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चाकू व निघालेली मूठ पोलिसांनी जप्त केली आहे.
























