एक्स्प्लोर

Raj Thackeray : हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

Raj Thackeray In Beed : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट परळी कोर्टाने अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Raj Thackeray In Beed : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट परळी कोर्टाने (Parli Court) अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं. तसंच त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. 

नेमकं काय प्रकरण आहे?

राज ठाकरे यांना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

अगोदर 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना बीडमधील परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती. त्यानुसार, राज ठाकरे आज म्हणजे 18 जानेवारीला परळी कोर्टात हजर राहिले आहेत. आपल्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती राज यांच्याकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. राज यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज ठाकरे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावून अटक वॉरंट रद्द केला. 

राज ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा 

या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करुन या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Embed widget