एक्स्प्लोर
बीडमध्ये विजयानंतर बजरंग बाप्पा मनोज जरांगेंच्या भेटीला
लोकसभा इलेक्शन बीडमध्ये विजयानंतर बजरंग बाप्पा मनोज जरांगेंच्या भेटीला आले त्यांनी गुलाल उधळून व शाल देऊन त्यांचा सत्कार केला.
abp majha reporter
1/10

पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली होती.1
2/10

मात्र, शेवटच्या फेऱ्यांमध्ये बजरंग सोनावणे यांनी मुसंडी मारली.
3/10

बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा तब्बल 7 हजारांनी पराभव केला.
4/10

बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांना नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या बजरंग सोनावणे यांना राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण होते, त्याचा बराच फायदा झाला.
5/10

बीडमध्ये मराठा आरक्षणामुळे जातीय संघर्ष पाहायला मिळाला.
6/10

शरद पवार गट आणि मविआचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले.
7/10

या सगळ्यांनी एकत्र येत राज्यात महायुतीविरोधात निर्माण झालेला असंतोष इन्कॅश करण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला.
8/10

बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्रीच अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
9/10

रात्री अडीच वाजता बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
10/10

या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनावणे यांची ताकद वाढवल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Published at : 05 Jun 2024 11:22 AM (IST)
आणखी पाहा























