(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hairfall: महागडी केमिकल उत्पादनं वापरणं सोडा; आंब्याची पानं वापरली तर थांबेल केस गळती
Hair Care: आंब्याची पानं केसांसाठी फायदेशीर असतात, त्यांच्या वापराने केस गळणे थांबू शकते. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात, जे कोलेजनचं उत्पादन वाढवण्याचं काम करतात.
Mango Leaves For Hair: आतापर्यंत तुम्ही आंबा आणि आंब्याच्या कोईचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आंब्याची पानं (Mango Leaves) देखील बरीच फायदेशीर आहेत, हे तुम्हाला माहित नसेल. केस आणि त्वचेसाठी आंब्याची पानं फार गुणकारी आहेत, हे क्वचित लोकांनाच ठाऊक आहे. तुम्हाला केस गळण्याची समस्या (Hair Fall Problem) उद्भवत असेल आणि ही केस गळती थांबवायची असेल, तर आंब्याची पानं उपयुक्त ठरतात. केस दाट आणि लांब करायचे असतील तर तुम्ही आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकता. तर जाणून घेऊया केसांसाठी आंब्याच्या पानांचे फायदे...
केसांसाठी आंब्याच्या पानांचे 7 फायदे
1. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
2. केसांची चमक वाढवण्यासाठी आणि त्यांचा पोत सुधारण्यासाठी आंब्याची पानं फायदेशीर आहेत.
3. आंब्याची पाने टाळूच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि रक्ताभिसरण वाढवण्याचं काम करतात.
4. या पानांमध्ये नैसर्गिक तेल आढळते, जे मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करते.
5. आंब्याची पाने कोलेजनचं उत्पादन वाढवतात, ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते.
6. आंब्याच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात. यामुळे केस पांढरे होत नाहीत.
7. आंब्याच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात, ज्यामुळे केस काळे होतात आणि ते चमकदार होतात, मजबूत पण होतात.
आंब्याची पानं कशी वापरायची?
1. प्रथम आंब्याची पानं बारीक करून त्याची पेस्ट तयार करा.
2. आता त्यात दही किंवा ऑलिव्ह ऑइल टाका.
3. हा हेअर मास्क केसांवर आणि टाळूवर पूर्णपणे लावा.
4. हेअर मास्क केसांना सुमारे 20 मिनिटं लावा आणि त्यानंतर केस पाण्याने चांगले धुवा.
5. केसांना शॅम्पू करा आणि जर तुम्हाला अधिक फायदे मिळवायचे असतील तर फक्त हर्बल शैम्पूचाच वापर करा.
जास्वंदीच्या फुलांचाही होतो केस गळती थांबवण्यासाठी वापर
1. प्रथम तीन ते चार जास्वंदाची पानं आणि जास्वंदाची फुलं मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा.
2. या पेस्टमध्ये 4 चमचे दही घाला. दही घातल्यानंतर ही पेस्ट मिक्स करा.
3. ही पेस्ट तुमच्या केसांवर आणि स्काल्पवर लावा.
4. ही पेस्च 1 तास केसांवर राहू द्या.
5. जर तुमच्याकडे शॉवर कॅप असेल तर तुम्ही डोक्याला पेस्ट लावल्यानंतर शॉवर कॅप घालू शकता.
6. एक तासानंतर डोकं कोमट पाण्यानं धुवा.
हेही वाचा:
Tips To Prevent Hair Fall: ओल्या केसांवर कधीही गुंडाळू नका टॉवेल! उद्भवू शकतात 'या' समस्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )