Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद (March Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
Bank Holidays in March 2023 : फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिना सुरु होईल. अशातच वर्षाचा तिसरा महिना सुरु होण्यापूर्वी (Bank Holidays in March 2023) बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. जर तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचं काम मार्च महिन्यात पूर्ण करायचं असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे.
मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद (March Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँक सुट्टी (March Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in March 2023) :
3 मार्च, 2023 : चापचर कुट
5 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
7 मार्च, 2023 : धूलिवंदन / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा
8 मार्च, 2023 : धुलेती / डोलजात्रा / धुलिवंदन / याओसांग दुसरा दिवस
9 मार्च, 2023 : होळी (पटना)
11 मार्च, 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
12 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
19 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 मार्च, 2023 : गुढीपाडवा
25 मार्च, 2023 : महिन्याचा चौथा शनिवार
26 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
30 मार्च, 2023 : श्रीराम नवमी
वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकाल. लाँग वीकेण्डसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, सेन्सेक्स 59400 च्या खाली, निफ्टीचीही घसरण