एक्स्प्लोर

प्रहारच्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद, अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची घोषणाबाजी; बच्चू कडूंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, रोजचं मारण्यापेक्षा..

Bacchu Kadu Protest : माझ्या शरीरावर आता परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय.

Bacchu Kadu Protest : सरकार समिती गठित करणार आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. समितीचा अहवाल नेमका किती दिवसात येईल? दिव्यांगांच्या मानधनात नेमकं किती वाढ केलं जाणार, हे ही सरकारनं सांगावं. किंबहुना कार्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे सरकार आता बोलू लागलं आहे, त्यामुळे 2-3 तास धीर धरावा. मला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. कारण आता शरीरावर परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

16 तारखेपासून अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करू- बच्चू कडू

प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर बच्चू कडू अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काल(13 जून) अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती. यावेळी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बावकुळेंनी केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं, असं आव्हान नयना कडूंनी केलंय.

शेतकऱ्यांची अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी 

अशातच  या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली, यावेळी मोठा गोंधळ झाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला, यावेळी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? 

खरं तर सरकारकडून या मागण्यांवर लवकर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र दिवसेदिवस वेळ जात आहे. 90% कर्जमाफी बद्दल जे सरकार बोलत होतं, ते कधी पर्यंत करणार? मुख्यमंत्री म्हणतात बैठकी घ्या. मात्र त्यावर तोडगा नेमका काय हे ही सरकारनं सांगावे असेही बच्चू कडू म्हणाले. आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे, असे समजतंय. मात्र कार्यकर्ते त्यात कुठेही कमी पडणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परत फोन आला, पण मला अजूनही लेखी पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की, 16 तारखेपासून मी अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करणार. उद्या 15 तारखेला राज्यभरात चक्काजाम आंदोलन आहे की नाही, त्यावर मी दुपारी बैठक घेऊन निर्णय घेणार. नयना कडू यांचं कालच्या भाषणावर बच्चू कडू म्हणाले की, एक पत्नी म्हणून तो राग आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ, 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Rohit Pawar on Ram Shinde: निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
Govind Pansare  : मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
MVA Election Commission: मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Lokmangal Bank : लोकमंगल बँक चोरीचा छडा, शिपाईच निघाला चोर
Pansare Murder Case : कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण, मुख्य आरोपीसह तिघांना जामीन
Farmers Protest: विमा कंपनीच्या काट्यात घोटाळा? शेतकरी संतापले
Beed Morcha : हिंदू मोर्चात राजकीय नाट्य, आमदार संग्राम जगतापांची माघार
MNS-ShivSena : ठाकरे बंधू, पवार एकत्र; निवडणूक आयोगाच्या भेटीने खळबळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Rohit Pawar on Ram Shinde: निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला; म्हणाले, गोल-गोल फिरवण्यापेक्षा...
Govind Pansare  : मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
MVA Election Commission: मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न
Digital Arrest: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटीचा गंडा; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटीचा गंडा; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir : हर्षित राणाची ट्रोलिंग, गौतम गंभीर अश्विनवर भडकला! म्हणाला, यूट्यूब चालवण्यासाठी नको ते उद्योग करु नको!
हर्षित राणाची ट्रोलिंग, गौतम गंभीर अश्विनवर भडकला! म्हणाला, यूट्यूब चालवण्यासाठी नको ते उद्योग करु नको!
Pune Accident News: जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस अन् दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, बसचालकाला बेड्या
जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस अन् दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, बसचालकाला बेड्या
Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच; दिवसाढवळ्या युवकावर हल्ला, दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार, अन्...
नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच; दिवसाढवळ्या युवकावर हल्ला, दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार, अन्...
Embed widget