Maruti Suzuki S-Cross: मारुती एस-क्रॉसला लागला कायमचा ब्रेक! कंपनीने वेबसाइटवरूनही हटवली कार
Maruti Suzuki S-Cross: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतात आपल्या 'एस-क्रॉस' कारला ब्रेक दिला आहे. कंपनीने ही कार आपल्या वेबसाइटवरून हटवली आहे. ही कार 2015 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती.
Maruti Suzuki S-Cross: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतात आपल्या 'एस-क्रॉस' कारला ब्रेक दिला आहे. कंपनीने ही कार आपल्या वेबसाइटवरून हटवली आहे. ही कार 2015 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. आता 7 वर्षानंतर ही कार बंद करण्यात आली आहे. कंपनीच्या या एसयूव्हीच्या जागी ग्रँड विटारा आणण्यात आली आहे. कंपनीने आधीच डीलरशिपला या कारची बुकिंग घेण्यास नकार दिला होता.
एस-क्रॉस हे नेक्सा अंतर्गत विक्री होणारे कंपनीचे पहिले मॉडेल आहे. ज्याची आतापर्यंत 1.69 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने ही कार लॉन्च करताना दोन डिझेल इंजिन पर्यायांसह आणली होती. ज्यात 1.3-लिटर युनिट आणि 1.6-लिटर युनिट समाविष्ट आहे. हे दोन्ही इंजिन फियाटकडून घेण्यात आली होती. याचे 1.3-लिटर डिझेल इंजिन भारतात टाटा, शेवरलेट आणि प्रीमियर सारख्या इतर अनेक कार निर्मात्यांनी वापरले होते. याशिवाय यात 1.6-लिटर डिझेल इंजिन मारुती एस-क्रॉसपेक्षा वेगळे होते. हे इंजिन 120 bhp पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.
कंपनीने एप्रिल 2020 मध्ये मारुतीच्या इतर मॉडेलप्रमाणे ही कार देखील पेट्रोल इंजिनसह आणली होती. हे 1.5-लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिन होते. जे माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. यासोबतच लॉन्चच्या पाच वर्षांनंतर पहिल्यांदा यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला होता. लॉन्च झाल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र काही काळानंतर याच्या विक्रीत मोठी घट झाली. ज्यामुळे आतापर्यंत केवळ 1.69 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
दरम्यान, याच्या जागी ग्रँड विटारा आणण्यात आली आहे. ही कार भारतात 10.45 लाख - 19.65 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ग्रँड विटारा माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन पर्यायांमध्ये कंपनीने लॉन्च केली आहे. नवीन ग्रँड विटारा बाजारात टोयोटा हायरायडर, किया सेल्टोस आणि ह्युंदाई क्रेटा यांच्याशी स्पर्धा करेल. मारुती एस-क्रॉस हे कंपनीचे चांगले मॉडेल होते. परंतु डिझाइनसह काही कारणांमुळे ते यशस्वी झाले नाही. यासोबतच कंपनीने वेळेनुसार अपडेट केले नाही, ज्यामुळे ती स्पर्धकांसमोर टिकू शकली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- BYD Electric: सिंगल चार्जमध्ये गाठते 420 किमी, BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार उद्या होणार लॉन्च, या इलेक्ट्रिक कार्सला देणार टक्कर
- दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करताय? ही कंपनी देतेय स्वस्तात मस्त लोन