एक्स्प्लोर

सेल्फ चार्जिंगसारख्या जबरदस्त फीचरसह Toyota Hyryder सादर, 'हे' फीचर्स फक्त यातच मिळणार

Toyota Urban Cruiser Hyryder 2022: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) अखेर आपली आगामी मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर Hyryder सादर केली आहे.

Toyota Urban Cruiser Hyryder 2022: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) अखेर आपली आगामी मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर Hyryder सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे Hyryder ला सेल्फ चार्जिंगसारख्या हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर करण्यात आले आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करू शकतात. कंपनी आपली ही नवीन SUV ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात लॉन्च करणार आहे.

मारुती आणि टोयोटा यांनी मिळून तयारी नवीन Toyota Hyryder 

या मॉडेल्सची निर्मिती कंपनीच्या कर्नाटकातील बिदाडी प्लांटमध्ये केली जाणार आहे. Glanza आणि अर्बन क्रूझर नंतर टोयोटा-सुझुकीची भागीदारी अंतर्गत हे पुढील मॉडेल असेल जे या प्लांटमध्ये तयार केले जाणार आहे. Hyryder आपला प्लॅटफॉर्म, डिझाइन एलिमेंट्स, फीचर्स आणि इंजिन मारुती विटारासोबत शेअर करेल. दोन्ही मॉडेल सुझुकी आणि टोयोटा यांनी त्यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत संयुक्तपणे विकसित केले आहेत.

सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन

2022 Toyota Urbain Cruiser Hyryder सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनने सुसज्ज असेल. या फीचरसह या जागतिक सेल्फ चार्जिंग तंत्रज्ञानाची भारतात एंट्री होणार आहे. Hyryder 40% अंतर आणि 60% वेळ इलेक्ट्रिक (EV) किंवा Zero Emission मोडवर चालण्यास सक्षम आहे. Urabn Cruiser Hyryder वर उपलब्ध असलेला आणखी एक पॉवरट्रेन पर्याय म्हणजे निओ ड्राइव्ह (Neo Drive). टोयोटा हायब्रीड सिस्टीम (THS) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह SUV मारुती सुझुकीकडून मिळवलेल्या 1.5-लीटर के-सिरीजच्या माईल्ड-हायब्रिड पॉवरट्रेनसह येते. हे 103 bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनचे एकत्रित पॉवर आउटपुट 85kW आहे. ही मोटर 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेल्या 2WD आणि 4WD पर्यायसह येईल. तसेच या एसयूव्हीमध्ये 177.6 V लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जे 25 किमी पर्यंत पूर्ण-इलेक्ट्रिक रेंज देते. कंपनीने दावा केला आहे की. SUV एकूण 24-25 kmpl चा मायलेज देते.

लूक आणि डिझाइन

Urban Cruiser Hyryder च्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, या SUV ला स्प्लिट हेडलॅम्प सेटअप मिळतो. जो अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. याला दोन्ही बाजूला स्लीक LED DRL सह स्लिम ग्रिल मिळते. तर फुल-LED हेडलॅम्प या कारच्या खालील बाजूस देण्यात आले आहे. मागील बाजूस, Hyryder ला टोयोटा लोगोसह स्लिम C-आकाराचे टेल लॅम्प मिळतात.

फीचर्स 

Toyota Hyryder ला लेदर-रॅप्ड डॅशबोर्डसह ड्युअल-टोन इंटीरियर मिळते. ही कार ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेकसह हेड-अप डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे. यात 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESP, हिल-होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारखे सेफ्टी फीचर्सही कंपनीने दिले आहेत.

वॉरंटी

कंपनी या कारवर ग्राहकांना 3 वर्ष किंवा 1,00,000 किमीची वॉरंटी आणि हायब्रिड आवृत्तीवर 8 वर्षे किंवा 1,60,000 किमीची बॅटरी वॉरंटी देत ​​आहे. तसेच यासह ग्राहकांना ऑनरोड सर्व्हिस ही कंपनी ऑफर करत आहे.

संबंधित बातमी: 

Toyota Hyryder revealed : टोयोटाच्या अर्बन क्रूझर Hyryder SUV कारचे पदार्पण; जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget