एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली! नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maruti Grand Vitara 2022: बहुप्रतीक्षित Maruti Grand Vitara अखेर भारतात लॉन्च झाली आहे. ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून या कारची प्रतीक्षा करत होते.

Maruti Grand Vitara 2022: बहुप्रतीक्षित Maruti Grand Vitara अखेर भारतात लॉन्च झाली आहे. ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून या कारची प्रतीक्षा करत होते. हे यावरून समजू शकेल की, ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग (Maruti Grand Vitara 2022 Booking) झाली आहे. कंपनीने ही कार भारतीय बाजारपेठेत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपयांच्या किंमतीत (Maruti grand Vitara 2022 Price) उतरवली आहे. या कारसह कंपनीने माध्यम आकाराच्या कार सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने ही कार माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे. चला तर या कारच्या फीचर्स आणि इंजिनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.   

ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात कंपनीने 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली सारख्या आधुनिक फीचर्सचाही पर्याय दिला आहे. तसेच माईल्ड आणि स्ट्रॉंग अशा हायब्रीड इंजिन पर्यायासह ही कार यात देण्यात आला आहे. ही कार  कर्नाटकातील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. Toyota Hyryder आणि Maruti Grand Vitara याचा प्लांटमध्ये एकसोबत विकसित करण्यात आली आहे.    

सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा +, अल्फा + या सहा ट्रिममध्ये कंपनीने ग्रँड विटारा एकूण 11 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये ही एसयूव्ही ऑटोमॅटिक, मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे. ग्रँड विटारा टॉप-एंड अल्फा, झेटा+ आणि अल्फा+ ट्रिम्समध्ये ड्युअल-टोन कलर पर्यायासह उपलब्ध आहे. ज्याची किंमत अतिरिक्त 16,000 रुपये आहे. ग्रँड विटारा मारुती सुझुकीच्या सबस्क्रिप्शन प्लॅनद्वारे देखील खरेदी केली जाऊ शकते. ज्यासाठी मासिक सदस्यता शुल्क 27,000 रुपयांपासून सुरू होते. ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कमसह नवीन ग्रँड विटारा ऑनलाइन किंवा डीलरशिपद्वारे बुक करू शकता. ग्रँड विटाराच्या बुकिंगने आधीच 55,000 युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. याच्या डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा कालावधी साडेपाच महिन्यांनी वाढला आहे. 

Grand Vitara चे इंजिन Toyota Hyryder सोबत शेअर केले आहे. हे K15C माईल्ड-हायब्रीड पेट्रोल इंजिनसह येते. जे 103 Bhp पॉवर जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Toyota Highrider प्रमाणे यात ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) प्रणाली फक्त माईल्ड-हायब्रीड मॅन्युअल प्रकारासह उपलब्ध आहे.

याशिवाय, ग्रँड विटाराला 1.5-लिटर, 3-सिलेंडर अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन हायराइडरकडून मिळाले आहे. जे इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. हे इंजिन 79 Bhp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते.  हायब्रिड पॉवरट्रेन 115 Bhp पॉवर जनरेट करते. हे इंजिन ई-सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मारुतीचा दावा आहे की, स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन 27.97 kmpl चा मायलेज देईल.

फीचर्स 

नवीन ग्रँड विटारामध्ये 6-स्पीकर अर्केमी ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, हेड्स-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहे . सुरक्षिततेच्या दृष्टीने मारुती ग्रँड विटारामध्ये सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सराउंड व्ह्यू मॉनिटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ABS-EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget