Toyota Innova Hycross : टोयोटा घेऊन येतेय मोठी बातमी, Innova दिसणार नव्या अवतारात
Toyota Innova Hycross : टोयोटा कंपनी आता पुन्हा एकदा देशात नवीन कार लाँच करण्यास उत्सुक आहे.
Toyota Innova Hycross : जपानी कार निर्माता कंपनी टोयोटा (Toyota) सतत नवनवीन प्रयोग करत असते. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपली नवीन कार Toyota Urban Cruiser HyRyder भारतीय बाजारपेठेत सादर केली होती. ही SUV मजबूत आणि सौम्य हायब्रिड इंजिनसह येते. टोयोटा कंपनी आता पुन्हा एकदा देशात नवीन कार लाँच करण्यास उत्सुक आहे. ऑटो कार इंडियाच्या अहवालानुसार, टोयोटा आपली अतिशय लोकप्रिय एसयूव्ही इनोव्हा एका नवीन स्वरूपात लॉन्च करणार आहे. इनोव्हा हायक्रॉस असे या कारचे नाव आहे. जाणून घेऊया या कारमध्ये काय खास असेल
Innova Hycross: Dimension
ही नवीन MPV कार सुमारे 4.7 मीटर लांब असू शकते. ही कार हलकी आणि मजबूत बनवण्यासाठी तिला मोनोकोक चेसिस देण्यात येणार आहे. ही कार बनवण्यासाठी टोयोटा आपल्या कोरोलासाठी वापरण्यात आलेला TNGA-C प्लॅटफॉर्म वापरेल, ज्याला सुमारे 2,850mm चा व्हीलबेस दिला जाऊ शकतो.
Innova Hycross: Look
या नवीन इनोव्हा हायक्रॉसचा लूक सध्याच्या इनोव्हापेक्षा थोडा वेगळा असू शकतो. या कारमध्ये एक नवीन फ्रंट लुक पाहता येईल, ज्यामध्ये नवीन डिझाइन फ्रंट ग्रिल आणि हेडलॅम्प देखील दिले जाऊ शकतात. तसेच, त्याची रचना अधिक शक्तिशाली आणि बोल्ड असण्याची अपेक्षा आहे. कार नवीन चाकांच्या कमानीसह 7 सीटर मॉडेल असेल, जी सध्याच्या इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांब असू शकते.
Innova Hycross: Engine
उत्तम मायलेज देण्यासाठी टोयोटा ही नवीन इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही हायब्रिड तंत्रज्ञानासह देऊ शकते. टोयोटानेही हेच तंत्रज्ञान आपल्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये वापरले आहे. टोयोटा या MPV मध्ये 2.0 L पेट्रोल-हायब्रिड इंजिन पर्याय देऊ शकते.
Toyota Land Cruiser LC300 भारतात होणार लाॅन्च
जपानची वाहन उप्तादक कंपनी टोयोटाची लँड क्रूझर (Land Cruiser) कार ही जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत या कारला मोठी मागणी आहे. याची मागणी इतकी वाढली आहे की, यासाठी एक दोन नाही तर तब्बल तीन वर्ष ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेक्स्ट जनरेशन टोयोटा लँड क्रूझरने इतर जागतिक बाजारात पदार्पण केलं आहे. आता ही कार भारतात ही लाॅन्च केली जाऊ शकते. नवीन LC300 ही CBU पूर्णपणे आयात केलेली SUV असेल. यामध्ये भारतात वितरित केलेल्या कारचा डिलिव्हरी कालावधी हा तीन वर्ष असण्याची शक्यता कमी आहे. ग्राहक ही कार बुकिंग केव्हा करतो त्यानंतर हा कालावधी नेमका कळू शकतो. भारतात ही कार बुक केल्यानंतर ग्राहकांना ती एक वर्ष किंवा त्यापेक्षा कालावधीत डिलिव्हरी केली जाईल.
महत्वाच्या बातम्या :