एक्स्प्लोर

McLaren Automotive: मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह भारतात घेणार एंट्री, मुंबईत उघडणार आपलं पहिलं शोरूम

McLaren Automotive: ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह (McLaren Automotive) लवकरच भारतात एंट्री घेणार आहे. कंपनीने मुंबईत आपलं पाहिलं शोरूम उघडणार असल्याची घोषणा केली आहे.

McLaren Automotive: ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह (McLaren Automotive) लवकरच भारतात एंट्री घेणार आहे. कंपनीने मुंबईत आपलं पहिलं शोरूम उघडणार असल्याची घोषणा केली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत पहिली डीलरशिप सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.    

मॅक्लारेन ऑटोमोटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या जगभरातील विस्ताराच्या उद्दिष्टांमध्ये ऑक्टोबरमध्ये भारतातील पहिले रिटेल स्टोअर सुरू करणे समाविष्ट आहे. यामुळे आशिया पॅसिफिक प्रदेशात ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत होईल. मॅक्लारेन यूकेच्या प्लांटमध्ये असेंबल सुपरकार्सची विक्री करते.

मॅक्लारेन ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक पॉल हॅरिस म्हणाले, "भारत ही लक्झरी आणि प्रिमियम कारसाठी मोठी बाजारपेठ आहे. येथील लोक बाहेरील देशातून मॅक्लारेन कार आयात करतात. आम्ही लवकरच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आमचे पहिले रिटेल स्टोअर सुरू करणार आहोत. भारतीय ग्राहकांना कंपनीच्या सुपरस्पोर्ट्स आणि हायब्रिड कारचा आनंद घेता यावा हे आमचे ध्येय आहे.'' पॉल म्हणाले की, कंपनीच्या रिटेल स्टोअरमध्ये सर्व मॉडेल्सवर विक्री केली जाईल. तसेच विक्रीनंतर सेवा, सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती सुविधा देईल.

कंपनीची भारतात आपल्या बऱ्याच कार लॉन्च करण्याची योजना आहे. यातच मॅक्लारेन जीटी आणि मार्कचे पहिले हाय-परफॉर्मन्स हायब्रिड आर्टुरा याचाही समावेश आहे. कंपनी भारतात आपल्या 720S सुपरकार्सची Coupe आणि Spyder रेंज सादर करणार आहे. यासोबतच कूप आणि स्पायडर कारही 765LT रेंजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

McLaren ने नुकतीच McLaren GT सुपरकार भारतीय बाजारात लॉन्च केली. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने भारतात या कारच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी घेतली. भारतात विकली जाणारी ही सर्वात स्वस्त मॅक्लारेन कार आहे. McLaren GT  सुपरकारमध्ये मिड-माउंटेड, 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन देण्यात आले आहे. जे 611 Bhp पॉवर आणि 630 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. McLaren GT फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. तर शून्य ते 200 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी याला 9 सेकंद लागतात. या सुपरकारचा टॉप स्पीड 327 किमी प्रतितास आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget