टीव्हीएसने लॉन्च केल्या Apache च्या दोन नवीन बाईक, पॉवरफुल इंजिनसह किंमत आहे
New Apache RTR 160: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात नवीन Apache बाईकच्या दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ही बाईक देशात खूपच लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये या बाईकची एक वेगळीच क्रेज आहे.
New Apache RTR 160: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात नवीन Apache बाईकच्या दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ही बाईक देशात खूपच लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये या बाईकची एक वेगळीच क्रेज आहे. कंपनीने भारतात याचे Apache RTR 160 आणि Apache RTR 180 हे दोन मॉडेल लॉन्च केले आहे. या दोन्ही नवीन बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेल पेक्षा खूपच अपडेट आणि आधुनिक असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा या दोन्ही बाईकचे वजन कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
किंमत
नवीन Apache 160 2V च्या ड्रम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.18 लाख रुपये आहे. तर याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये आहे. त्याच्या ब्लूटूथ सिस्टीम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. तसेच Apache 180 च्या 2V मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे.
Apache RTR 160 आणि Apache RTR 180 मध्ये मिळणार हे इंजिन
नवीन Apache RTR 160 मध्ये 160cc सिंगल सिलेंडर, 2-वाल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 8400 rpm वर 15 Bhp पॉवर आणि 7000 rpm वर जास्तीत जास्त 13.9 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Apache RTR 180 मध्ये 180cc सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 17bhp ची कमाल पॉवर आणि 15.5 न्यूटन मीटरचा सर्वाधिक टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.
फीचर्स
TVS Apache RTR 160 ड्रम, डिस्क आणि ब्लूटूथ अशा तीन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. या बाईकमध्ये रेस टेलीमेट्री, गियर पोझिशन इंडिकेटर, लॅप टाइमर, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल ब्राइटनेस, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस नोटिफिकेशन्स, क्रॅश अलर्ट असिस्ट यांसारखी 28 फीचर्स देण्यात आली आहेत. ब्लू, ग्रे, रेड, ब्लॅक आणि व्हाईट अशा रंगांच्या निवडीमध्ये ही बाईक देण्यात आली आहे. Apache RTR 180 निळ्या आणि काळ्या रंगात ऑफर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Cars : टाटा कारवर बंपर डिस्काउंट! Tata Tiago ते Tata Safari पर्यंत 'या' कारचा यादीत समावेश
- Airbag Feature Cars in India : देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा; जाणून घ्या कारण