Toyota Car : टोयोटाने 2700 इलेक्ट्रिक कार केल्या रिकॉल; जाणून घ्या काय आहे कारण
Toyota Car Recalling : प्रसिद्ध अशा टोयोटा कारने आपल्या 2700 इलेक्ट्रिक कार परत मागवल्या आहेत. कारच्या चाकांबाबत सतत येणाऱ्या तक्रारी पाहता कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
![Toyota Car : टोयोटाने 2700 इलेक्ट्रिक कार केल्या रिकॉल; जाणून घ्या काय आहे कारण Toyota Car electric bZ4X recalls 2700 electric cars decision taken due to problem in wheels marathi news Toyota Car : टोयोटाने 2700 इलेक्ट्रिक कार केल्या रिकॉल; जाणून घ्या काय आहे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/681bfa349444e53e9d55cac7eaad3a91_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Toyota Car Recalling : प्रसिद्ध अशा टोयोटा कारने आपल्या 2700 इलेक्ट्रिक कार परत मागवल्या आहेत. कारच्या चाकांबाबत सतत येणाऱ्या तक्रारी पाहता कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये टोयोटाची bZ4X इलेक्ट्रिक SUV लाँच होऊन दोन महिनेही झाले नाहीत, या मोठ्या रिकॉलची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनीच दिली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव, यूएस, युरोप, कॅनडा आणि जपानमध्ये विकल्या गेलेल्या सर्व टोयोटाच्या इलेक्ट्रिक कार त्यांच्या चाकांमधील समस्या दूर करण्यासाठी आणि कुठे कमतरता होती हे पाहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मोठा अपघात होण्याची शक्यता :
टोयोटा कंपनीच्या PRO ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने इलेक्ट्रिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गाडी चालवताना जर कारचे चाक वेगळे झाले तर यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. या यमस्येपासून दूर राहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कंपनी या प्रकरणाचा तपास करत आहे
कारच्या चाकांमध्ये हा अडथळा नेमका कशामुळे निर्माण झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. तूर्तास कंपनी या प्रकरणाची चौकशी करत आहे.
सुबारूने 2600 इलेक्ट्रिक कार सॉल्टेरादेखील परत मागवली
जपानी कार उत्पादक कंपनी सुबारूने देखील खुलासा केला आहे की, या कारच्या चाकांमध्ये वारंवार समस्या येत असल्याच्या तक्रारींमुळे ते त्यांच्या इलेक्ट्रिक कार सॉल्टेराचे 2600 युनिट्स देखील परत मागवत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत टोयोटा कार मागे
टोयोटा ही कार प्रत्यक्षात पाहिल्यास ती इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात फार उशीराने आली. टेस्लाने जवळपास 14 वर्षांपूर्वी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती, तर टोयोटाने गेल्या महिन्यातच जपानमध्ये इलेक्ट्रिक कार bZ4X लाँच केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra Scorpio N : महिंद्रा कंपनीची सर्वात बहुप्रतिक्षीत कार Scorpio-N आज होणार लॉन्च; वाचा A to Z माहिती
- Mahindra Scorpio-N : बहुप्रतिक्षीत Mahindra Scorpio-N धमाकेदार फीचर्ससह लवकरच भारतात होणार लॉन्च; पाहा याचा Classy लूक
- Anand Mahindra Scorpio N : 'स्कॉर्पियो एन'मधील N म्हणजे काय? आनंद महिंद्रांना युझरचा प्रश्न, सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)