एक्स्प्लोर

Yamaha R15 V4 ते Suzuki Hayabusa; 2021 मध्ये लाँच झालेल्या 5 उत्तम बाइक्स

Top 5 bikes launched in India in 2021 : यावर्षी काही उत्तम मोटारसायकल्स लाँच करण्यात आल्या. दरम्यान TVS Raider 125, Yamaha R15 V4 आणि Suzuki Hayabusa सारख्या अनेक उत्तम मोटरसायकल लॉन्च झाल्या आहेत.

Top 5 bikes launched in India in 2021 : यंदाच्या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, त्यावर मात करत यावर्षी काही उत्तम मोटारसायकल्स लाँच करण्यात आल्या. दरम्यान TVS Raider 125, Yamaha R15 V4 आणि Suzuki Hayabusa सारख्या अनेक उत्तम मोटरसायकल लॉन्च झाल्या आहेत.

2021 वर्षातल्या टॉप 5 मोटारसायकल

TVS Raider 125 - 
टीव्हीएसने TVS Raider 125 ही बाईक अलिकडेच लॉन्च केली. ही बाजारपेठेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण 125cc मोटरसायकल पैकी एक ठरली. या बाईकमध्ये 124.8cc, सिंगल-सिलेंडर, तीन-वाल्व्ह, एअर-आणि-ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 11.2 hp पॉवर आणि 11.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. TVS Raider 125 ची भारतात किंमत 77,500 ते रु 85,469 (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.Yamaha R15 V4 ते Suzuki Hayabusa; 2021 मध्ये लाँच झालेल्या 5 उत्तम बाइक्स

Bajaj Pulsar 250 - 
बजाज ऑटोने या वर्षी आपली सर्वात मोठी पल्सर मोटरसायकल लॉन्च केली. नवीन बजाज पल्सर 250 मध्ये 249.07cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे जे 24.1 hp पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील मिळतो. बजाज पल्सर 250 रेंजची सध्या भारतात किंमत 1.38 लाख ते 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Yamaha R15 V4 ते Suzuki Hayabusa; 2021 मध्ये लाँच झालेल्या 5 उत्तम बाइक्स

Yamaha R15 V4 - 
यामाहाने अलीकडेच भारतात नवीन जनरेशन R15 लाँच केलं आणि ते नेहमीपेक्षा चांगले आहे. नवीन Yamaha R15 V4 हे YZF-R7 मध्यम वजनाच्या सुपर स्पोर्टच्या डिझाईन सारखी आहे आणि त्यात अनेक सेगमेंटमध्ये फर्स्ट फीचर्स मिळतात. मोटारसायकलला उर्जा देणारे 155cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, VVA तंत्रज्ञानासह इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. ही मोटर १८.४ एचपी पॉवर आणि १४.२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या मोटरसायकलची किंमत सध्या 1.70 लाख ते 1.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Yamaha R15 V4 ते Suzuki Hayabusa; 2021 मध्ये लाँच झालेल्या 5 उत्तम बाइक्स

Royal Enfield Classic 350 - 
रॉयल एनफील्डने यावर्षी भारतात न्यू जनरेशन Classic 350 लाँच केली. सेकंड जनरेशन क्लासिक 350 ही नवीन J-सिरीज 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर- आणि ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिनद्वारे तयार आहे जी 20 hp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन Royal Enfield Classic 350 ची भारतात सध्या किंमत रु. 1.84 लाख ते रु. 2.15 लाख (एक्स-शोरूम) आहे.

Yamaha R15 V4 ते Suzuki Hayabusa; 2021 मध्ये लाँच झालेल्या 5 उत्तम बाइक्स

New-Gen Suzuki Hayabusa - 
या यादीत असलेली शेवटची मोटरसायकल सुझुकी हायाबुसा... थर्ड जनरेशन मधील सुझुकी हायाबुसाने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक स्तरावर लॉन्चिंग केले आणि काही वेळात भारतीय बाजारपेठेत पोहोचली. ही 1340cc, इनलाइन-फोर-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे तयार आहे जी 187 hp आणि 150 Nm पीक टॉर्क देते. ही 6-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स शी जोडलेली आहे. नवीन Suzuki Hayabusa ची सध्या भारतात किंमत 16.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget