Father's Day: फादर्स डे निमित्त 'या' इलेक्ट्रिक स्कूटर ठरू शकतात बेस्ट गिफ्ट, मिळेल 140 किमीची रेंज
Father's Day Gift: फादर्स डेच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या वडिलांना काही खास वस्तू द्यायची असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर हा एक उत्तम पर्याय आहे.
Father's Day Gift: फादर्स डेच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या वडिलांना काही खास वस्तू द्यायची असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर हा एक उत्तम पर्याय आहे. इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे खूप सोपे आहे, तसेच ती खरेदी केल्यानंतर पेट्रोल भरण्यापासून देखील सुटका मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगत आहोत, ज्या कमी किमतीत उत्तम फीचर्स आणि अधिक रेंजसह येतात. चला जाणून घेऊया...
Okinawa Praise Pro
जर तुम्हाला तुमच्या वडिलांना स्टायलिश स्कूटर भेट द्यायची असेल तर Okinawa Praise Pro हा एक चांगला पर्याय आहे. ही स्कूटर 87,593 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे आणि लिथियम आयन बॅटरीसह येते. पूर्ण चार्ज केल्यावर, ही स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये 88 किमीची रेंज देते. Okinawa Praise Pro ची टॉप स्पीड 58 किमी/तास आहे. ही हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी आवश्यक आहे. तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा डीलरशिपला भेट देऊन Okinawa Praise Pro बुक करू शकता. ऑनलाइन बुकिंगसाठी कंपनी 2,000 रुपये आकारते.
Hero Eddy
हिरो एडी ही कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्याला ऑपरेट करण्यासाठी नोंदणी आणि परवाना आवश्यक नाही. स्कूटर लिथियम आयन बॅटरीसह येते आणि पूर्ण चार्ज केल्यावर 85 किमीची रेंज देते. या स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. हिरो इलेक्ट्रिकच्या एडी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, अँटी Thief लॉक, फॉलो मी हेडलाइट, रिव्हर्स मोड, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, यूएसबी पोर्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत. राइडचा दर्जा सुधारण्यासाठी यात रुंद सीट आणि मोठे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हिरो एडीला 72,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
Hero Optima CX
जर तुम्ही उत्तम रेंज असलेली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hero Optima CX हा एक चांगला पर्याय आहे. ही स्कूटर 62,190 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत उपलब्ध आहे. Hero Optima CX सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरी मॉडेल्समध्ये येतो. ड्युअल बॅटरी मॉडेलची रेंज 140 किमी आहे. ही स्कूटर 45 किमी / ताशी वेगाने धावू शकते. याची ड्युअल लिथियम-आयन बॅटरी 4-5 तासांत पूर्ण चार्ज होते.