![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Safest Cars in India : 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार, मिळाली आहे टॉप सेफ्टी रेटिंग; पाहा संपूर्ण लिस्ट
Safest Cars in India : देशात अनेक लोक कोणतीही कार घेताना त्याचा लूक पाहतात. मात्र जितका आपण कारचा लूक पाहतो तितकेच त्या कारचे सेफ्टी फीचर्सही पाहायला हवे.
![Safest Cars in India : 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार, मिळाली आहे टॉप सेफ्टी रेटिंग; पाहा संपूर्ण लिस्ट these are the safest cars in the country receiving top safety ratings See the full list marathi auto news Safest Cars in India : 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार, मिळाली आहे टॉप सेफ्टी रेटिंग; पाहा संपूर्ण लिस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/479e265852d6647cd14715135171cba01669892198376384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Safest Cars in India : देशात अनेक लोक कोणतीही कार घेताना त्याचा लूक पाहतात. मात्र जितका आपण कारचा लूक पाहतो तितकेच त्या कारचे सेफ्टी फीचर्सही पाहायला हवे. कारण कार चालवत असताना अपघात झाल्यास चांगले सेफ्टी फीचर्स कारमध्ये असल्यास तुमचा जीव वाचू शकतो. म्हणून कारचे सेफ्टी फीचर्स पाहणे खूप महत्वाचे असते. अशातच आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात टॉप सेफ्टी रेटिंग असलेल्या कारबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार....
स्कोडा कुशक (skoda kushaq)
स्कोडा कुशक 5 रेटिंगसह देशातील सर्वात सुरक्षित कारमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल एनसीएपी (NCAP) रिपोर्टमध्ये कारला प्रौढ आणि लहान मुलांमधील स्कोअरमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. ही कार 11.55 लाख ते 19 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.
टाटा पंच (tata punch)
सुरक्षित कारच्या लिस्टमध्ये टाटा मोटर्सची एसयूव्ही कार पंचचाही समावेश आहे. ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये, कारने प्रौढ आणि लहान मुलांच्या स्कोअरमध्ये अनुक्रमे 5 स्टार आणि 4 स्टार मिळाली आहे. या कारची किंमत 5.82 लाख ते 9.48 लाख रुपये आहे.
महिंद्रा XUV300
महिंद्राच्या सुरक्षित कारच्या लिस्टमध्ये XUV300 कारचाही समावेश आहे. ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये या कारने प्रौढ आणि लहान मुलांसाठी 5 स्टार आणि 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारची किंमत 8.42 लाख ते 12.38 लाख रुपयांदरम्यान आहे.
टाटा अल्ट्रोझ (tata altroz)
सुरक्षित कारच्या लिस्टमध्ये टाटाची दुसरी कार टाटा अल्ट्रोझ देखील समाविष्ट आहे. ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये कारने प्रौढ आणि लहान मुलांच्या स्कोअरमध्ये 5 स्टार आणि 3 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारची किंमत 6.20 लाख ते 10.15 लाख रुपयांदरम्यान आहे.
टाटा नेक्सन (tata nexon)
सुरक्षित कारच्या लिस्टमध्ये टाटाची एसयूव्ही कार नेक्सनचाही समावेश आहे. कारला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षितता स्कोअरमध्ये 5 स्टार आणि 3 स्टार रेट केले आहे. या कारची किंमत 7.54 लाख ते 13.80 लाख रुपयांदरम्यान आहे.
इतर ऑटो संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)