एक्स्प्लोर

'या' आहेत देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7 सीटर कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Top MPV Cars in India: भारतात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक 7 सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात.

Top MPV Cars in India: भारतात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक 7 सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच कारबद्दल माहिती सांगणार आहोत, जी आकाराने मोठी असून ज्याची आसन क्षमता ही जास्त आहे. चला तर जाणून घेऊ. 

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

सप्टेंबर महिन्यात एर्टिगाच्या 9,299 युनिट्सची विक्री करून कंपनीने पहिला क्रमांक पटकावला आहे. या कारमध्ये, तुम्हाला 1.5-L Dualjet पेट्रोल इंजिन मिळेल. ज्यामध्ये 103 PS ची पॉवर आणि 136.8 NM पीक टॉर्क देणारे माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञान आहे. तसेच याच्या CNG प्रकारात, तुम्हाला 88 PS ची पॉवर आणि 121.5 NM टॉर्क मिळतो. याशिवाय 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. ही कार पेट्रोलवर 20.51 किमी आणि सीएनजीवर 26.11 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची प्रारंभिक किंमत तिच्या टॉप व्हेरियंटसाठी 8.41 लाख ते 12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर CNG प्रकारासाठी याची किंमत 10.50 लाख ते 11.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta)

सप्टेंबर महिन्यात इनोव्हा क्रिस्टा ही मारुती सुझुकी एर्टिगा नंतर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. कंपनीने या कारच्या 7,282 युनिट्सची विक्री केली. आधुनिक फीचर्सने सुसज्ज असलेल्या या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 2,694 cc पेट्रोल इंजिन आहे. जे 5200 rpm वर 164 bhp ची पॉवर आणि 4000 rpm वर 245 Nm चा पीक-टॉर्क जनरेट करते. याशिवाय ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे. याच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही कार 15.6 kmpl मायलेज देते. कंपनीने या कारची किंमत 17.8 लाख ते 26.5 लाख रुपये ठेवली आहे.

कियाची कॅरेन्स (Kia Carens)

सप्टेंबर महिन्याच्या विक्री अहवालात ही कार 5,233 युनिट विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. Kia ही अत्यंत कमी वेळात भारतीय कार बाजारात आपले स्थान निर्माण करणारी कार आहे. या कारची मागणी पाहता कंपनीला आपल्या ग्राहकांना दीड वर्षांपेक्षा जास्त प्रतीक्षा कालावधी द्यावा लागला. या कारची किंमत 9.60 लाख ते 17.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, याला तीन इंजिन पर्याय मिळतात, पहिले 1.5 L पेट्रोल इंजिन आहे. जे 115 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 140 PS पॉवर आणि 242 Nm टॉर्क जनरेट करते आणि तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन जे 115PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड डीसीटी, 6-स्पीड ऑटोमॅटिक (AMT) पर्यायांसह इको, नॉर्मल आणि स्पोर्ट सारखे तीन ड्राइव्ह मोड देखील मिळतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
Embed widget