एक्स्प्लोर

Auto Sales: टाटा, टोयोटाची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री; जुलै महिन्यात इतर कार कंपन्यांनी किती वाहन विकले?

Auto Sales Report July 2022: वाहन उत्पादक कंपन्यांनी जुलै 2022 मध्ये विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. मारुती सुझुकीसोबतच ह्युंदाई, महिंद्रा, किया यांनी जुलै महिन्यात विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Auto Sales Report July 2022: वाहन उत्पादक कंपन्यांनी जुलै 2022 मध्ये विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. मारुती सुझुकीसोबतच ह्युंदाई, महिंद्रा, किया यांनी जुलै महिन्यात विक्रीत वाढ नोंदवली आहे. तर टोयोटा, टाटा यांनीही या महिन्यात सर्वाधिक मासिक विक्री केली आहे.

Maruti Suzuki

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki)  सोमवारी सांगितले की, 2021 च्या याच महिन्यात 162,462 युनिट्सच्या तुलनेत जुलै महिन्यात त्यांनी एकूण 175,916 युनिट्सची विक्री केली. या एकूण विक्री संख्येपैकी 155,605 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या, तर उर्वरित 20,311 युनिट्स परदेशी बाजारात निर्यात करण्यात आल्या आहेत. कंपनीला अलीकडच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला असताना, लहान आणि हॅचबॅक सेगमेंटवर मारुतीची मजबूत पकड कायम आहे. तर प्रमुख वाहन म्हणून ग्रँड विटारा लॉन्च केल्याने कंपनीला पूर्वीपेक्षा अधिक मोठा पल्ला गाठता आला आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कारची विक्री वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीची एकूण देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री 142,850 युनिट्स होती. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 133,732 युनिट्स होती. इतर OEM ची विक्री 9,939 युनिट्स आणि निर्यात 20,311 युनिट्सवर होती.

Toyota Kirloskar Motor

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM)  सोमवारी जाहीर केले की, कंपनीने जुलै 2022 मध्ये एकूण 19,693 युनिट्सची विक्री केली. जी भारतात कंपनी स्थापन झाल्यापासून एका महिन्यात निर्मात्याची आतापर्यंतची सर्वाधिक घाऊक विक्री आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील घाऊक विक्रीच्या तुलनेत ही वाढ 50 टक्क्यांनी वाढली आहे. TKM ने जुलै 2021 मध्ये 13,105 युनिट्सची विक्री केली. तर जून 2022 मध्ये घाऊक विक्री 16,500 युनिट्सची विक्री झाली. यात 19 टक्के वाढ झाली आहे.

Tata Motors

भारतातील प्रमुख तीन कार निर्मात्यांपैकी एक Tata Motors ने जुलैमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल 57 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 47,505 वाहनांची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 30,185 युनिट्सची विक्री झाली होती. एकूणच टाटा मोटर्सने जुलैमध्ये 81,790 वाहने विकली. ज्यात व्यावसायिक वाहने आणि निर्यात केलेल्या युनिटचा समावेश आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये 54,119 युनिट्सच्या तुलनेत एकूण विक्री 51 टक्क्यांनी वाढली आहे.

Hyundai

Hyundai Motor India ने जुलैमध्ये एकूण वाहन विक्रीत सहा टक्के वाढ नोंदवली आहे. जी गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 60,249 युनिट्सच्या तुलनेत जुलै 2022 मध्ये 63,851 युनिट होती. गेल्या महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री 50,500 युनिट्सवर होती. जी जुलै 2021 मध्ये 48,042 युनिट्सच्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी वाढली आहे. दक्षिण कोरियाच्या वाहन निर्मात्या कंपनीची निर्यात 9.4 टक्क्यांनी वाढून 13,351 युनिट्सवर गेली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात 12,207 युनिट्स होती.

Mahindra 

महिंद्रा अँड महिंद्राने सोमवारी सांगितले की, त्यांनी जुलै महिन्यात एकूण 56,148 वाहनांची विक्री केली. त्यापैकी जवळपास निम्मी एसयूव्ही लाइनअपची होती. 2020 मध्ये लाँच केलेल्या अपडेटेड थार आणि 2021 मध्ये लॉन्च झालेल्या XUV700 चे प्रचंड यश महिंद्राला चांगला नफा देत आहेत.

Kia

Kia India ने सोमवारी जुलैमध्ये घाऊक विक्रीत 47 टक्क्यांनी वाढ करून 22,022 युनिट्सची नोंद केली. तर जुलै 2021 मध्ये 15,016 युनिट्सची विक्री झाली. गेल्या महिन्यात कंपनीने सेल्टोसच्या 8,451 युनिट्स, सोनेटच्या 7,215 युनिट्स, कार्निव्हलच्या 5,978 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 288 युनिट्सची विक्री केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget