Tata Punch EV: टाटा पंच EV मध्येही मिळणार नवीन टाटा नेक्सनचे अनेक फीचर्स, लवकरच होणार लाँच
टाटा पंच ईव्ही देशातील सिट्रोएन ई सी 3 शी स्पर्धा करेल. पोर्टफोलिओमध्ये ही नेक्सन ईव्ही एमआरच्या खाली आणि टियागो ईव्ही हॅचबॅकच्या वर स्थित असेल.
Tata Punch EV features: अलीकडेच टाटा मोटर्सने (Tata Motors) आपली नेक्सन एसयूव्ही (Nexon SUV) अनेक नवीन अपडेट्ससह बाजारात लाँच केली आहे. आता कंपनी पुढच्या महिन्यात पंच ईव्ही (Tata Punch EV) लाँच करण्याच्या तयारीत आहे, त्याची किंमत लवकरच जाहीर होऊ शकते. पंच ईव्हीच्या स्टायलिंगमध्ये मोठे बदल दिसणार नाहीत, पण त्यात काही फीचर अपग्रेड्स देण्यात येणार आहेत, जे बहुतेक नेक्सन ईव्ही (Nexon EV) फेसलिफ्टमध्ये दिसतात.
टेस्टिंग मॉडेलमध्ये काय दिसलं?
टाटा पंच ईव्हीच्या मॉडेलची पहिली चाचणी काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घेण्यात आली. ताशी 100 किमी वेगाने गाडी चालवण्यात आली, यातून असं दिसून आलं ती पंच ईव्हीमध्ये अनेक नवीन फिचर्स पाहायला मिळू शकतात. स्पाय शॉटमध्ये दिसलेल्या पंच ईव्हीमध्ये एलईडी हेडलॅम्प सेट-अप होता, जो स्टँडर्ड पेट्रोल पंच कारवर उपलब्ध नाही. तसंच, आतील भागावर नजर टाकल्यास त्यात आकाराने मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळण्याची देखील शक्यता आहे.
मोठी टचस्क्रीन मिळणार
टाटा मोटर्सने नुकतीच Nexon EV फेसलिफ्ट लाँच केली, ज्यामध्ये 12.3-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळत आहे. मिड व्हेरियंटसाठी 10.25-इंचची ही स्क्रिन देण्यात येऊ शकते. टाटा पंच ईव्हीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 10.25-इंचची इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळण्याची अपेक्षा आहे. पंच ईव्ही थेट Citroen EC3 शी स्पर्धा करेल, जी समान आकाराच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनसह येते.
सनरुफ मिळणार की नाही?
सध्या, पंच पेट्रोल लाईन-अपला अलीकडे काही व्हेरिएंटमध्ये सनरूफ मिळालं आहे. टाटा मोटर्स पंच ईव्हीमध्ये सनरूफ देते की नाही हे पाहणं बाकी आहे. जर ही पंच ईव्ही सनरूफसह आली तर, या वैशिष्ट्यासह येणारी ही भारतातील सर्वात परवडणारी ईव्ही असेल. कारण त्याची प्रतिस्पर्धी Citroen eC3 देखील हे वैशिष्ट्य देत नाही.
पंच EV टाटाच्या Ziptron पॉवरट्रेनसह येईल आणि समोरच्या बंपरवर चार्जिंग सॉकेटसह येणारी ही पहिली Tata EV असेल. स्टँडर्ड नवीन डिझाइन हे अलॉय व्हील्स आणि डिस्क ब्रेक्स सोबत काही स्टाइलिंग बदलासोबत पाहायला मिळेल.
पॉवरट्रेन आणि रेंज
पंच ईव्ही टाटाच्या Gen-2 EV आर्किटेक्चरसह अल्फा प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे विशेषतः कारच्या ICE ते EV व्हर्जनसाठी डिझाइन केलं गेलं आहे. हे लिक्विड-कूल्ड बॅटरी आणि पुढच्या चाकांच्या एक्सलवर बसवलेली परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरसह येईल. Tigor, Tiago आणि Nexon EV प्रमाणे, Tata Motors Punch EV देखील दोन भिन्न बॅटरी आकार आणि चार्जिंग पर्यायांसह येऊ शकते.
टाटा पंच ईव्ही कोणाशी स्पर्धा करणार?
पंच EV देशातील Citroen e C3 शी स्पर्धा करेल. हे पोर्टफोलिओमध्ये Nexon EV MR च्या खाली आणि Tiago EV हॅचबॅकच्या वर स्थित असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा पंच ही कार टिगोर ईव्ही सेडानला एसयूव्ही पर्याय म्हणून बाजारात आणली जाईल.
हेही वाचा:
Car Handbrake System : गाडीचा हँडब्रेक लावल्यानं होऊ शकतं लाखो रुपयांचं नुकसान, असा करा योग्य वापर