एक्स्प्लोर

Tata Nexon EV : ग्राहकांसाठी खुशखबर! Tata Motors कडून Nexon EV Max ची किंमत कमी; 'हे' असेल खास वैशिष्ट्य

Tata Nexon EV Price : आता Nexon EV Max ची रेंज देखील 437 किमी वरून 453 किमी प्रति चार्ज झाली आहे.  

Tata Nexon EV Price : अलीकडेच दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 देशात लॉन्च केली आहे. यानंतर, टाटा नेक्सॉन ईव्हीला (Tata Nexon EV) महिंद्राच्या कारकडून जबरदस्त टक्कर दिली जाणार आहे. हे पाहून टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन इलेक्ट्रिकच्या किंमती बदलल्या आहेत. त्यामुळे टाटा नेक्सॉन कार आता 85,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. याबरोबरच या कारची रेंजही वाढवण्यात आली आहे. आता Nexon EV Max ची रेंज देखील 437 किमी वरुन 453 किमी प्रति चार्ज झाली आहे.  

कारची नवीन किंमत किती? (Tata Nexon EV Price) :

Tata Nexon EV Max XM व्हेरिएंटची नवीन किंमत 14.49 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, त्याच्या XZ + व्हेरिएंटची नवीन किंमत 15.99 लाख रुपये झाली आहे. आता त्याचे XZ + Lux व्हेरिएंट 16.99 लाख रुपये आहे.

Tata Nexon EV Max मध्ये 40.5kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे, 3.3kW आणि 7.2kW चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. 3.3kW चार्जरसह Nexon EV Max ची एक्स-शोरुम किंमत 16.49 लाख ते 18.49 लाख दरम्यान आहे, तर 7.2kW चार्जरसह EV Max ची बाजारातील किंमत 16.99 लाख ते 18.99 लाख दरम्यान आहे. ज्यामध्ये आता Nexon EV Max XM व्हेरियंटची किंमत ₹16.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत ₹17.49 लाख, XZ+ लक्स व्हेरिएंटची किंमत ₹18.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत ₹17.99 लाख, XZ+ लक्सची (7.2 kW) किंमत ₹19 लाख झाली आहे.

कारचं वैशिष्ट्ये काय? (Tata Nexon EV Specifications) :

Nexon EV Prime ला 30.2kWh बॅटरी पॅक मिळतो, जो फ्रंट-एक्सल माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसह 129PS आणि 245 Nm आउटपुट करतो. यात ड्राइव्ह आणि स्पोर्ट्स सारखे ड्राइव्ह मोड मिळतात. याला प्रति चार्ज 312 किमीची रेंज मिळते. 

Nexon EV Max 40.5kWh बॅटरी पॅकद्वारे आधारित आहे, जे इलेक्ट्रिक मोटरसह 143PS आणि 250Nm आउटपुट देते. याला प्रति चार्ज 453 किमी टॉर्कची ARAI प्रमाणित रेंज मिळते. 

'हे' असतील कारचे फीचर्स? (Tata Nexon EV Features) :

Tata Nexon EV Max मध्ये ZConnect ऍप्लिकेशनसह प्रगत ZConnect 2.0 कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आहे. ज्यामध्ये 48 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध आहेत. सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत, इलेक्ट्रिक SUV ला हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि ऑटो व्हेईकल होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि i-VBAC (इंटेलिजेंट - व्हॅक्यूम-लेस बूस्ट आणि सक्रिय नियंत्रण) सह ESP मिळते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mahindra XUV e8: देशातील पहिली बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही पुढील वर्षी होणार लॉन्च, जाणून घ्या कशी आहे महिंद्राची 'ही' जबरदस्त कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sharad pawar Spl Report : पवार-शिंदेच्या भेटीने ठाकरे का अस्वस्थ झले? फडणवीसांना इशारा काय?Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEOABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सGanga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget