Bikes Sales September 2023 : सुझुकी मोटरसायकलने देशांतर्गत केली सर्वाधिक विक्री, वाचा सविस्तर
सुझुकी मोटारसायकलने गेल्या महिन्यात तब्बल 1,03,336 गाड्यांची विक्री केली होती. तर मागील वर्षी याच कालावधीत 79,559 दुचाकींची विक्री केली होती.
Bikes Sales September 2023 : सुझुकी (Suzuki) मोटारसायकल इंडियाने आॅगस्ट 2023 चा वार्षिक अहवाल सादर केला आहे. ज्यात कंपनीने वार्षिक आधारावर निर्यातीसह दुचाकी गाड्यांची विक्री 30 टक्क्यांनी वाढवली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण किती मोटारसायकली विकल्या गेल्या ते सविस्तर जाणून घेऊयात.
सुझुकी विक्री ऑगस्ट 2023 रिपोर्ट
सुझुकी मोटारसायकलने गेल्या महिन्यात तब्बल 1,03,336 गाड्यांची विक्री केली होती. तर मागील वर्षी याच कालावधीत 79,559 दुचाकींची विक्री केली होती. म्हणजे पाहायला गेले तर दुचाकीच्या गाड्यांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कंपनीने सांगितले की, कंपनीने ऑगस्टमध्ये निर्यात बाजारात 20,291 वाहनांचीही विक्री केली आहे.
Suzuki Motorcycle India ने Gixxer SF 250 ने मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू, मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2 आणि मेटॅलिक सोनिक सिल्व्हर आणि मेटॅलिक ट्रायटन ब्लू कलर पर्यायांसह लाँच केले होते. Gixxer 250 मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू आणि मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2 रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल. सोबतच मेटॅलिक सोनिक सिल्व्हर, पर्ल ब्लेझ ऑरेंज, मेटॅलिक ट्रायटन ब्लू आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक सारखे रंग देखील ग्राहकांकरता ऑफर करेल.
मोटारसायकलला कॉस्मेटिक बदलांच्या रूपात कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात. या दुचाकी मोटारसायकल ब्लूटूथ डिजिटल कन्सोलसह येतात. ज्यामुळे मोटारसायकल तुमच्या स्मार्टफोनशी आरामात कनेक्ट केली जाऊ शकते. हे अॅप टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल (Incoming Call), एसएमएस अलर्ट (SMS Alert) , व्हॉट्सअॅप अलर्ट (WhatsApp Alert) डिस्प्ले आणि मिस्ड कॉल (Missed Call) नोटिफिकेशन यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
Gixxer SF 250 फिचर्स
Suzuki Gixxer SF 250 ही बाईक Gixxer SF प्रमाणेच आहे. मात्र हिला एक नवीन पेंट स्कीम देण्यात आली आहे, ज्यामध्ये नवीन मॅट फिनिश दिसत आहे. Gixxer SF स्पोर्ट्स बाईकमध्ये 249 CC, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे या बाईकला 26.13 bhp पॉवर आणि 22.2 Nm टॉर्क देते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Gixxer SF 250 अपडेट केल्यानंतर, ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कन्सोल, सुझुकी इझी स्टार्ट सिस्टम आणि एलईडी हेडलॅम्प (Headlamp) आणि टेल लॅम्प (Tale Lamp) देखील जोडले गेले आहेत. Suzuki Gixxer SF 250 बाईक 1.93 लाख रुपयांच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
संबंधित बातमी: