SONY ची वाहन क्षेत्रात एंट्री, बनवणार हायटेक इलेक्ट्रिक कार
Sony Honda Electric Car: भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत एकापेक्षा जास्त कंपन्या पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Sony Honda Electric Car: भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत एकापेक्षा जास्त कंपन्या पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अशा कंपनीही आहेत ज्यांचा दुचाकी, चारचाकी वाहनांच्या उत्पादनाशी काहीही संबंध नव्हता. मात्र ते आता वाहन क्षेत्रात एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. अशाच कंपनीच्या नावांमध्ये SONY चाही समावेश होतो. सोनीची म्युझिक सिस्टीम, साउंड वगैरे गाड्यांमध्ये असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र असं असलं तरी वाहन व्यवसायाशी सोनी कंपनीचा काहीही संबंध नव्हता. पण आता लवकरच तुम्हाला सोनीची इलेक्ट्रिक कार पाहायला मिळणार आहे.
सोनी आणि होंडा या जपानच्या दोन दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. होंडा ही ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, तर सोनी ही एक टेक कंपनी आहे. दोघे मिळून Apple सारख्या कंपनीशी स्पर्धा करतील, कारण Apple देखील इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे.
Honda आणि Sony या दोन्ही कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलं होत की, ते EVs ची योजनावर काम करत आहेत. दोन्ही कंपन्या 2025 पर्यंत जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये त्यांची EV विकण्याची योजना सादर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. जपानमधील होंडाच्या प्लांटमध्ये ईव्हीची निर्मिती केली जाईल. या दोन्ही कंपनीची अपकमिंग कार कोणत्या सेगमेंटमधील असेल, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. भारतातील एसयूव्ही सेगमेंटमधील आगामी टाटा नेक्सॉन खूप लोकप्रिय आहे. अशातच होंडा आणि सोनी संयुक्तपणे एसयूव्ही श्रेणीमधील वाहन लॉन्च करू शकतात, अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Citroen C3 Car Review : नवीन इंजिन, प्रीमिअम लूकसह वाचा Citroen C3 चा संपूर्ण रिव्ह्यू
- प्रतीक्षा संपली! Hyundai Venue Facelift भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह मिळणार हे फीचर्स
- बजाज प्रत्येक महिन्याला करणार 5000 चेतक EV चे उत्पादन, 16,000 हून अधिकची झाली बुकिंग
- डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा सरस, विक्रीत झाली विक्रमी वाढ