एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली! Hyundai Venue Facelift भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह मिळणार हे फीचर्स

Hyundai India : नवीन 2022 Hyundai Venue Facelift अखेर गुरुवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. अपडेटेड मॉडेल लाइनअप 6 ट्रिमसह 10 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.

Hyundai India : नवीन 2022 Hyundai Venue Facelift अखेर गुरुवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. अपडेटेड मॉडेल लाइनअप 6 ट्रिमसह 10 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यात E, S, S+, S (O), SX आणि SX (O) प्रकाराचा समावेश आहे. याच्या बाह्य आणि आतील भागात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर इंजिन आणि गिअरबॉक्सचे ऑप्शन पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहेत.

किंमत किती? 

नवीन 2022 Hyundai Venue Facelift ची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमतीत नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट एसयूव्ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय वाहनांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. या सेगमेंटमध्ये Tata Nexon SUV भारतात विकल्या जाणार्‍या सर्व SUV मध्ये आघाडीवर आहे. असं असलं तरी आगामी 2022 मारुती सुझुकी विटारा ब्रेझा फेसलिफ्ट SUV या सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करणार आहे. 

प्रास्ताविक किंमत? 

1.0 लिटर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टर्बो पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. नवीन Venue डिझेल 9.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. या प्रास्ताविक किमती असल्याचे कंपनीने म्हटले आहे. म्हणजेच भविष्यात त्यांची किंमत वाढू शकते. 2022 Hyundai Venue ला तीन अॅक्सेसरीज पॅक मिळतील - बेसिक (Basic ), अॅडव्हान्स (Advance ), सुप्रीम (Supreme ), ज्या अंतर्गत 47 अॅक्सेसरीज उपलब्ध असतील.

बुकिंग सुरू

नवीन 2022 Hyundai Venue SUV खरेदी करू इच्छिणारे ग्राहक 21,000 रुपये टोकन रक्कम भरून ऑनलाइन किंवा अधिकृत Hyundai डीलरशिपवर ही कार बुक करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, काही प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी आधीच 16 आठवड्यांपर्यंत वाढला आहे.

इंजिन आणि पॉवर 

Hyundai ने नवीन Venue च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 1.0-लिटर टर्बो GDi आणि 1.2-लिटर MPi कप्पा पेट्रोल इंजिन पर्यायांसह, हे पूर्वीप्रमाणेच 1.5-लीटर CRDi डिझेल इंजिनसह ऑफर केले जाईल. ट्रान्समिशन पर्याय 6-स्पीड मॅन्युअल किंवा IMT तसेच DCT गिअरबॉक्स असेच राहतील. 1.2-लिटर पेट्रोल इंजिन 83 PS पॉवर आणि 114 Nm टॉर्क निर्माण करते आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यापेक्षा अधिक शक्तिशाली टर्बो मोटर आहे, जी 120 PS आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 100 PS पॉवर आणि 240 Nm टॉर्क जनरेट करते. टर्बो पेट्रोल इंजिन 6-स्पीड सेमी-ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीसीटी युनिटशी जोडलेले आहे, तर डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget