Citroen C3 Car Review : नवीन इंजिन, प्रीमिअम लूकसह वाचा Citroen C3 चा संपूर्ण रिव्ह्यू
Citroen C3 Car Review : नवीन Citroen C3 Car 20 जुलैला लॉन्च होणार आहे. तर या कारची बुकिंग 1 जुलैपासून सुरु होणार आहे.
Citroen C3 Car Review : लक्झरी कार ही अशी आहे की ती सगळ्यांनाच घ्यावीशी वाटते. परंतु, किंमत जास्त असल्या कारणाने प्रत्येकालाच लक्झरी कार घेणं शक्य होत नाही. अशाच सर्वसामान्यांसाठी नवीन Citroen C3 कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. भारतात Citroen C3 ही कार पुढील महिन्यात लॉन्च होतेय. भारतात कॉम्पॅक्ट SUV Car ची होणारी बंपर विक्री पाहून ही कार तयार करण्यात आली आहे. Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम लाँच केली होती. आता नवीन Citroen C3 Car 20 जुलैला लॉन्च होणार आहे. तर या कारची बुकिंग 1 जुलैपासून सुरु होणार आहे. या कारची खासियत नेमकी काय आहे हे या रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घ्या.
Citroen C3 एकतर 1.2l मानक नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल किंवा अधिक पॉवरफुल 1.2l टर्बो पेट्रोलसह मिळवू शकता. उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव देण्यासाठी पॉवरफुल टर्बो व्हर्जन निवडण्यात आले आहे. आकडेवारी दर्शवते की, ती इतर SUV किंवा हॅचबॅकला पूर्ण शक्तीसाठी सहज मागे टाकते. इंजिन केवळ 10 सेकंदात 0-100 किमी 110hp आणि 190 Nm देते.
Citroen C3 Car चे फीचर्स :
C3 ची लांबी 3,981mm, रुंदी 1,733mm आणि उंची 1,586mm आहे. ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे तर व्हीलबेस 2,540 मिमी आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाईल. तसेच रेंज 86ps सह 12.l पेट्रोल आणि अधिक पॉवरफुल 110ps 1.2l टर्बो पेट्रोलसह सुरू होईल. यामध्ये 1.2l पेट्रोलची इंधन कार्यक्षमता 19.8 kmpl आहे. तर, टर्बो पेट्रोल 19.4 kmpl आहे. 1.2l टर्बोमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
Citroen C3 Car चा इंटर्नल लूक :
Citroen C3 कंपनीचा असा दावा आहे की, हाय सीट तसेच, कारमध्ये कूलिंगसाठी AC डिझाइन तसेच 315l बूट स्पेस आहे. C3 4 सिंगल टोन आणि दोन ड्युअल टोन रंगांसह 56 कस्टमायझेशन पर्यायांसह 3 पॅकसह येईल. प्लस 70 अॅक्सेसरीज डीलर स्तरावर ऑफर केल्या जातील. Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :