Upcoming Cars: स्कोडाची 'ही' जबरदस्त कार 9 मे रोजी होणार लाँच, स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल इंजिनसह मिळणार हे फीचर्स
Skoda new car 2022: दिग्गज कार निर्माता कंपनी स्कोडा 9 मे रोजी Kushaq Monte Carlo व्हेरिएंट भारतात लॉन्च करणार आहे.
Skoda new car 2022: दिग्गज कार निर्माता कंपनी स्कोडा 9 मे रोजी Kushaq Monte Carlo व्हेरिएंट भारतात लॉन्च करणार आहे. गेल्या वर्षी भारतात लाँच झालेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्पोर्टी लूक व्हेरिएंटच्या रूपात ही नवीन कार बाजारात आणली जाईल. नवीन कुशक मॉन्टे कार्लो एडिशन हे टॉप व्हेरियंट असेल. ही आवृत्ती मॅन्युअल आणि स्वयंचलित 1.0 TSI आणि 1.5 TSI इंजिनसह ऑफर केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. तसेच त्याची किंमत 18 लाख ते 19.50 लाख रुपये असू शकते. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
लूक आणि फीचर्स
Skoda ने यापूर्वी अनेक Monte Carlo कारचे व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. Kushaq मॉडेलला नवीन ब्लॅक-आउट तसेच संपूर्ण बॉडी प्रोफाइलमध्ये कॉन्ट्रास्ट रेड हायलाइट मिळण्याची अपेक्षा आहे. इतर प्रमुख स्पोर्टी प्रोफाइलमध्ये पुढील बंपरसाठी ब्लॅक लिप स्पॉयलर, मागील बंपरवर स्पोर्टी डिफ्यूझर डिझाइन, ब्लॅक साइड स्कर्टिंग आणि बरेच काही समाविष्ट असू शकते. याशिवाय हे मॉडेल इतर मॉडेल्सपेक्षा चांगले आणि वेगळे दिसण्यासाठी त्यावर 'मॉन्टे कार्लो' बॅजचा खास लोगो दिला जाऊ शकतो.
दोन इंजिन पर्याय
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कुशक मॉन्टे कार्लो एडिशन दोन पेट्रोल इंजिनसह सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये पहिले 1.0-लिटर 3-सिलेंडर TSI इंजिन असेल, जे 113 bhp आणि 175 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. तसेच दुसरे 1.5 लिटर 4-सिलेंडर TSI इंजिन असेल, जे 148 bhp आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ट्रान्समिशनच्या बाबतीत, 1.0-लीटर TSI 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये पर्यायी 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे, तर 1.5-लीटर TSI 7-स्पीड DSG गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
महत्वाच्या बातम्या