नवीन अपडेटसह पुन्हा भारतात लॉन्च झाली Renault Kiger, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Update Car: फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Renault ने आपली Renault Kiger अपडेट करून पुन्हा भारतात लॉन्च केली आहे.
Update Car: फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Renault ने आपली Renault Kiger अपडेट करून पुन्हा भारतात लॉन्च केली आहे. यात अनेक टेक संबधित फीचर्स कंपनीने अपडेट केले आहेत. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदीदारांमध्ये अधिक लोकप्रिय होण्यासाठी कंपनीने हे अपडेट केले असल्याचे बोलले जात आहे. भारतात याची स्पर्धा Hyundai Venue, Nissan Magnite, Toyota Urban Cruiser आणि Maruti Suzuki Vitara Brezza सारख्या कारशी होणार आहे. आपल्या या कारमध्ये कंपनीने कोणते नवीन बदल केले आहेत. हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
इंजिन
Renault Kiger मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहे. यात 1.0L एनर्जी इंजिनला MT आणि EASY-R AMT ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. तसेच 1.0L टर्बो इंजिनमध्ये MT आणि X-TRONIC CVT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. यापूर्वी गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Kieger RXT (O) प्रकारात MT आणि X-tronic CVT ट्रान्समिशनच्या पर्यायासह 1.0-लिटर टर्बो इंजिन देण्यात आले होते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 20.5 kmpl मायलेज देते.
कोणते आहेत नवीन अपडेट?
क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग यासारखे काही फीचर्स आजकाल भारतीय बाजारात ऑफर केलेल्या कारमध्ये अपडेट केल्या जात आहेत. 2022 Renault Kiger मध्येही हे फीचर्स अपडेट केले गेले आहेत. PM2.5 Advance Atmospheric Filter आजच्या कारमध्ये दिसत आहे. याशिवाय याला रेड फेड डॅशबोर्ड अॅक्सेंट आणि रेड स्टिचिंगसह एम्बॉस्ड सीट अपहोल्स्ट्री मिळते. कारमध्ये 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देखील अपडेट केले आहेत. नवीन किगर टर्बो रेंजमध्ये फ्रंट स्किड प्लेट, टेल गेटवर क्रोम, टर्बो डोअर डेकल्स आणि मेटल मस्टर्डमध्ये मिस्ट्री ब्लॅक रूफसह ड्युअल टोनमध्ये एक नवीन रंग पर्याय देखील मिळतो.
किंमत किती?
2022 Renault Kiger ची प्रारंभिक किंमत 5.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनी ही कार चेन्नईजवळील प्लांटमध्ये तयार करेल. चेन्नई प्लांटमधून कंपनीची भारतीय बाजारपेठ तसेच नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया सारख्या परदेशातील बाजारपेठांमध्ये निर्यात सुरू राहील.